Wimbledon 2022 Final: विम्बल्डन 2022 च्या उपांत्य फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचनं (Novak Djokovic) ब्रिटेनच्या कॅमरून नॉरीला (Cameron Norrie) पराभूत करून अंतिम फेरी गाठली. येत्या 10 जुलैला विम्बल्डन 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात जोकोविच ऑस्ट्रेलियाच्या किर्गिओसशी (Nick Kyrgios) भिडणार आहे. या सामन्यात नोवाक जोकोविचला रॉजर फेडररचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी आहे. 

जोकोविचनं मागील तीन वेळा सलग विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. विम्बल्डन 2022 च्या स्पर्धेतील अंतिम जिंकल्यास जोकोविच सलग चौथ्यांदा विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरेल.  तसेच जोकोविचच्या नावावर 21  ग्रँड स्लॅम जिंकण्याची नोंद केली जाईल. रॉजर फेडररनं आतापर्यंत 20 ग्रँड स्लॅम जिंकली आहेत.

सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे खेळाडू-

खेळाडूंचं नाव विजय
राफेल नदाल (स्पेन) 22  ग्रँड स्लॅम
नोवाक जोकोविच (सर्बिया) 20  ग्रँड स्लॅम
रोजर फेडरर (स्विझरलॅंड)  20  ग्रँड स्लॅम

सर्वाधिक वेळा  ग्रँड स्लॅमचा अंतिम सामना खेळणारे खेळाडू-

नोवाक जोकोविच 32
रोजर फेडरर 31
राफेल नदाल 30
इव्हान लेंडल 19
पीट सेम्पास 18

जोकोविचची नॉरीविरुद्ध कडवी झुंज
विम्बल्डन 2022 च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पहिल्या मानांकित जोकोविचला नवव्या मानांकित नॉरीविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागली. या सामन्यातील पहिला सेट मध्ये नॉरीनं जोकोविचचा  2-6 असा पराभव केला. मात्र, पुढील तीन सेटमध्ये जोकोविचने पुनरागमन करत नॉरीचा 6-3, 6-2 आणि 6-4 असा पराभव करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. 

हे देखील वाचा-