Legends League Cricket: लेजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket) दुसऱ्या हंगामाला येत्या 20 सप्टेंबर रोजी सुरुवात होणार आहे. या लीगचा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. यावेळी चार संघात ही स्पर्धा रंगणार आहे. या लीगच्या दुसऱ्या हंगामात वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) , इरफान पठाण (Irfan Pathan), युसूफ पठाण (Yusuf Pathan), मुथय्या मुरलीधरन (Muralitharan), मोन्टी पानेसर (Monty Panesar), प्रवीण तांबे (Pravin Tambe), नमन ओझा (Naman Ojha), एस बद्रीनाथ (S. Badrinath), स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny), असगर अफगान (Asghar Afghan) यांसारखे खेळाडून खेळणार असल्याचं माहिती देण्यात आली होती. मात्र, आता या लीगमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत (S. Sreesanth), मिस्बाह उल हक आणि केविन ओ ब्रायननं यांनीही या हंगामात खेळण्याचं स्पष्ट केलंय.


लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत श्रीसंतची प्रतिक्रिया
टी-20 विश्वचषक 2017 मध्ये श्रीसंतनं घातक गोलंदाजी केली. या विश्वचषकात भेदक गोलंदाजी करत अनेक विरोधी संघाच्या फलंदाजाला माघारी घाडलं होतं. भारतानं हा विश्वचषक जिंकला होता. श्रीसंत गेल्या 9 वर्षांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, लीजेंड्स लीग क्रिकेटमधून मैदानात पुन्हा मैदानात पुनरागमन करत आहे. यावर श्रीसंतनं आपली प्रतिक्रिया दिलीय. "पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करून आनंद होतोय. या लीगसाठी मी खूप उस्तुक आहे. या हंगामात चांगलं प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा करतोय", असं श्रीसंतनं म्हटलंय.


लेजेंड्स लीग क्रिकेटचे सीईओ काय म्हणाले?
लेजेंड्स लीग क्रिकेटचे सीईओ रमन रहेजा म्हणाले की, या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू त्यांच्या देशातील महान खेळाडूंपैकी एक आहेत. आम्ही एलएलसी फॅमिलीमध्ये श्रीशांत आणि मिसबाह उल हक यांचे स्वागत करतो. आशा आहे की हे सर्व खेळाडू चांगलं क्रिकेट खेळू शकतील आणि या लीगचा आनंद लुटू शकतील.


या लीग मध्ये कोणकोणत्या देशातील खेळाडू खेळणार?
लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे खेळाडू एकसोबत खेळताना दिसणार आहे. या लीगच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा माजी खेळाडूंचं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. 


हे देखील वाचा-