India Tour Of Zimbabwe: वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये झिम्बॉवेचा ( Zimbabwe Vs India) दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बॉवे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक समोर आलं असून सर्व सामने कधी, कुठे रंगणार आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महत्वाचं म्हणजे, भारत आणि झिम्बॉवे यांच्यात खेळली जाणारी तीन सामन्यांची टी-20 मालिका आयसीसी एकदिवसीय सुपर लीगचा भाग असेल. भारताविरुद्ध मायभूमीवर खेळली जाणारी एकदिवसीय मालिका झिम्बॉवेसाठी अतिशय महत्वाची असेल. कारण, या मालिकेतील गुण पुढच्या होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रतेसाठी मोजले जातील. भारतासाठी ही मालिका इतकी महत्वाची नाही. भारत अगोदरचं आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरलाय. 

भारतीय संघ 15 ऑगस्टला झिम्बॉवे दौरा करण्याची शक्यता
भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यातील अखेरचा सामना 7 ऑगस्ट 2022 खेळणार आहे. त्यानंतर एक आठवड्यानंतर भारत झिम्बॉवेचा दौरा करण्याची शक्यता आहे. भारत 15 ऑगस्टला झिम्बॉवेला दाखल होऊ शकतो. क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि झिम्बॉवे यांच्यातील सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळले जातील. “भारताचं यजमानपद मिळवून आम्हाला खूप आनंद झालाय. आम्ही स्पर्धात्मक आणि अविस्मरणीय मालिकेची वाट पाहत आहोत”, असं झिम्बाब्वे क्रिकेटच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलंय. 

झिम्बॉवे- भारत एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-

सामना कधी ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब

दरम्यान, तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बॉवे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. 

हे देखील वाचा-