Sri Lanka Economic Crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत पुन्हा एकदा महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान, आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्यात आला असून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पळ काढल्याची माहिती समोर आलीय. महत्वाचं म्हणजे, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असताना आंदोलकांनी गॉल स्टेडियममध्ये धडक दिलीय. या आंदोलनात श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांचाही सहभाग असल्याचं समजत आहे.


श्रीलंकेवर आर्थिक संकट
श्रीलंकेतील आर्थिक संकट दिवसेंदिवस आणखी गडद होताना दिसत आहे. दरम्यान, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळेच श्रीलंकेतील जनता आक्रमक झाली असून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत.  गोटाबाया राजपक्षे  यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकाकडून केली जात आहे. या आंदोलनात सनथ जयसूर्या सहभागी झालय. राष्ट्रीपती भवानाजवळ जमलेल्या आंदोलकांमध्ये सनथ जयसूर्यादेखील उपस्थित असल्याचं समजत आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे निवासस्थानातून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. 


आंदोलकात दिग्गजांचा सहभाग
महत्वाचं म्हणजे, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गॅले येथील गॅले क्रिकेट स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. जिथेही आंदोलकांनी धडक दिली. शनिवारी मोठ्या संख्येनं आंदोलक गॅलेमध्ये दाखल झाले आणि स्टेडियमच्या बाहेर आणि आत पोस्टर फडकावत महागाईविरुद्ध आवाज उठवत निदर्शने केली. श्रीलंकेत अलग- अलग ठिकाणी आंदोलक गर्दी करताना दिसत आहेत. या आंदोलानात अनेक दिग्गज सहभाग दर्शवताना दिसत आहेत. 


आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झटापट
कोलंबोमध्ये निदर्शनांदरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झटापट  झाली आहे. पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी पाण्याच्या फोवाऱ्याचाही वापर केला आहे. हे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या महागाईमुळं श्रीलंकेतील जनता त्रस्त झालीय. 


हे देखील वाचा-