Ind vs Eng सामन्यादरम्यान संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला झाली गंभीर दुखापत, चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर?
किरण महानवर
Updated at:
09 Feb 2025 05:36 PM (IST)

1
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान पाहुण्या संघाला मोठा धक्का बसला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
संघाचा प्रमुख फलंदाज जेकब बेथेल दुखापतीला बळी पडला आहे.

3
आता बातमी येत आहे की, जेकब बेथेल केवळ भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील उर्वरित सामन्यांमधूनच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर पडू शकतो.
4
बातमीनुसार, बेथेलची दुखापत गंभीर आहे आणि त्यामुळे आता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे कठीण झाले आहे.
5
इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खूप आधी आपला संघ जाहीर केला होता.
6
पण, आता खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे त्यांना त्यांच्या संघात बदल करावे लागू शकतात.
7
सर्व संघांना त्यांच्या संघात बदल करण्यासाठी 12 फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे.