Ind vs Eng 1st Test Rishabh Pant: शतक ठोकताच स्टँडमध्ये आले, कोलांटी उडी मारण्याची विनंतीही केली; पण पंतने नकार दिला, आता गावसकर म्हणतात...
Ind vs Eng 1st Test Rishabh Pant: इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Ind vs Eng 1st Test Rishabh Pant: इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने (Ind vs Eng Test Match) इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात 6 धावांची आघाडी मिळाल्याने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 364 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडला आता पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी 371 धावा कराव्या लागतील. चौथ्या दिवशी भारताकडून केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी शतके झळकावली. परंतु खालच्या क्रमवारीमधील भारतीय खेळाडूंनी पुन्हा खराब कामगिरी केली.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या उपकर्णधार ऋषभ पंतने इतिहास रचला. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा मान पटकावला. 93 वर्षांच्या भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात हे अभूतपूर्व यश आहे. पण, शतक केल्यानंतर पंत जास्त काळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 140 चेंडूत 118 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
LADIES & GENTLEMAN - PLEASE STAND UP AND SALUTE RISHABH PANT:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 23, 2025
- The first ever Asian Wicketkeeper in Test history to score twin centuries. 🥶 pic.twitter.com/aKKmhCj9cc
स्टँडमधून सुनील गावसकरांची विनंती, पण...
ऋषभ पंतने पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर कोलांटी उडी मारुन सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे ऋषभ पंतने दुसऱ्या डावात शतक झळकावल्यानंतर सर्वांना कोलांटी उडी पाहण्याची उत्सुकता होती. मात्र, ऋषभ पंतने यावेळी असे काही न करता साधेपणाने शतकाचा जल्लोष केला. यावेळी स्टँडमध्ये असलेले दिग्गज सुनील गावसकर यांनीही त्याला इशारा करून कोलांटउडी मारण्यास सांगितले. याकडे ऋषभ पंतनेही, 'पुढच्या वेळी मारेन', असे इशाऱ्याने सांगितले.
𝐓𝐡𝐞 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐰𝐢𝐜𝐤𝐞𝐭-𝐤𝐞𝐞𝐩𝐞𝐫 𝐭𝐨 𝐬𝐦𝐚𝐬𝐡 𝐭𝐰𝐢𝐧 𝐜𝐞𝐧𝐭𝐮𝐫𝐢𝐞𝐬 𝐢𝐧 𝐚 𝐓𝐞𝐬𝐭 𝐦𝐚𝐭𝐜𝐡! 🙌🏻
— Star Sports (@StarSportsIndia) June 23, 2025
Take a bow, @RishabhPant17, brilliant would be an understatement! 🫡🔥#ENGvIND 1st Test Day 4 LIVE NOW Streaming on JioHotstar 👉… pic.twitter.com/4A1Poe5jbC
ऋषभ पंतच्या शतकानंतर आणि कोलांटी उडी मारण्याच्या नकारानंतर गावसकर म्हणाले...
चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर ऋषभ पंतबद्दल बोलताना गावसकर म्हणाले, ऋषभ पंतच्या शतकानंतर मी खूप, खूप आनंदी आहे. जेव्हा जेव्हा एखादा भारतीय चांगला खेळतो तेव्हा खूप आनंद होतो. कारण तुम्हाला भारतातील क्रिकेटची आवड माहित आहे.
Sunil Gavaskar talking about his gesture when Rishabh Pant scored the hundred. pic.twitter.com/ydiVtkVQ5V
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 23, 2025
कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा दुसरा यष्टीरक्षक-
या शतकासह, पंत कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक करणारा जगातील दुसरा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अँडी फ्लॉवरने ही कामगिरी केली होती. 2001 मध्ये, त्याने हरारे येथे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीच्या दोन्ही डावात अनुक्रमे 142 आणि नाबाद 199 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त, इतर कोणत्याही यष्टीरक्षकाला हे करता आलेले नाही.





















