IND vs BAN LIVE Score: भारत आणि बांगलादेशमध्ये पुण्यात सामना, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
India vs Bangladesh LIVE Score: एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील सामना 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
भारताचा बांगलादेशवर सात विकेटने विजय... विराट कोहलीचे दमदार शतक
विराट-राहुलमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली आहे. भारताला विजयासाठी 28 धावांची गरज
भारताचे द्विशतक फलकावर लागले आहे. विराट कोहली आणि राहुल मैदानात आहेत. भारताला विजयासाठी 56 धावांची गरज आहे.
श्रेयस अय्यरच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. अय्यर 19 धावा करुन तंबूत परतलाय.
विराट कोहलीने 48 चेंडूत अर्धशतक ठोकले. यंदाच्या विश्वचषकातील तिसरे अर्धशतक विराट कोहलीच्या बॅटमधून निघाले आहे.
अर्धशतकानंतर शुभमन गिल तंबूत परतलाय. गिल याला मेहदी मिराज याने बाद केले. भारत दोन बाद 132 धावा.... विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानावर
रोहित शर्मा 48 धावांवर बाद झालाय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला. रोहित शर्माने 40 चेंडूत 48 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकारांचा समावेश आहे.
रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकात 250 धावांचा टप्पा पार केला.
रोहित शर्माने बांगलादेशची गोलंदाजी फोडून काढली आहे. भारतीय संघ 9 षटकात बिनबाद 50 धावा झाल्या आहेत
टीम इंडियाची वादळी सुरुवात... रोहित शर्माने बांगलादेशची गोलंदाजी फोडली
रोहित शर्मा आणि गिल फलंदाजीला मैदानात उतरले आहेत.
एकापाठोपाठ एख विकेट पडल्यानंतर बांगलादेशचा डाव लवकर आटोपणार असेच वाटत होते. पण नसुम अहमद, महमुदल्लाह यांनी बांगलादेशसाठी फटकेबाजी केली. अखेरच्या षटकात त्यांनी धावगती वाढवली. नसुम आणि महमुदल्लाह यांनी 26 चेंडूत 32 धावांची भागिदारी केली. नसुमने 14 धावांची खेळी करत महमुदल्लाह याला चांगली साथ दिली. नसुम बाद झाल्यानंतर महमुदल्लाह यांने बांगलादेशची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. महमुदल्लाह याने अखेरीस 36 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. बांगलादेशचा संघ 256 धावांपर्यंत मजल मारु शकला.
चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली. भारताच्या माऱ्यापुढे बांगलादेशने निर्धारित 50 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 256 धावांपर्यंत मजल मारली. सलमी फलंदाज लिटन दास याने 66 तर टी हसन याने 51 धावांची खेळी केली. त्याशिवाय अखेरीस महमुदल्लाह याने 46 धावांचे महत्वाचे योगदान दिले. भारताकडून रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. सलग चौथ्या विजयासाठी भारताला 257 धावांचे आव्हान आहे.
सर रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. एकाही फलंदाजाला मोठा फटका मारता आला नाही. रविंद्र जाडेजाने दहा षटकांत फक्त 38 धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने लिटन दास आणि शांतो यांना तंबूत पाठवले.
कुलदीप यादव याने भारताला पहिले यश मिळवून दिले होते. कुलदीप यादवने 10 षटकात 47 धावा खर्च करत एक विकेट घेतली.
मोहम्मद सिराजने 10 षठकात 60 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या.
जसप्रीत बुमराह याने 10 षटकात 41 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या.
शार्दूल ठाकूर याने 9 षटकात 59 धावा खर्च करत एक विकेट घेतली.
मोहम्मद सिराजने 10 षठकात 60 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या.
बांगलादेशला आठवा धक्का बसला आहे. बुमराहने घेतली विकेट
शार्दूल ठाकूर याने 9 षटकात 59 धावा खर्च करत एक विकेट घेतली. सुरुवातीला शार्दूल ठाकूरची गोलंदाजी महागडी ठरली होती. पण त्याने नंतर भेदक मारा केला.
कुलदीप यादव याने भारताला पहिले यश मिळवून दिले होते. कुलदीप यादवने 10 षटकात 47 धावा खर्च करत एक विकेट घेतली.
मोहम्मद सिराज याने बांगलादेशला सातवा धक्का दिला. सिराजच्या बाऊन्सवर नसुम राहुलकडे झेल देऊन परतला. त्याला 14 धावा करता आल्या.
बांगलादेशचं द्विशतक पूर्ण झालेय.
बांगलादेशला सहावा धक्का बसलाय. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर रहीमचा रविंद्र जाडेजाने जबराट घेतला
सर रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. एकाही फलंदाजाला मोठा फटका मारता आला नाही. रविंद्र जाडेजाने दहा षटकांत फक्त 38 धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने लिटन दास आणि शांतो यांना तंबूत पाठवले.
रविंद्र जाडेजाने लिटन दास याला 66 धावांवर तंबूत पाठवले..
मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर मिराज बाद झाला. केएल राहुल याने हवेत उंचावत घेतला जबरा झेल
बांगलादेशचा सलामी फलंदाज लिटन दास याने अर्धशतक ठोकले. 62 चेंडूत 52 धावांची खेळी केली. बांगलादेश दोन बाद 113 धावा
रविंद्र जाडेजा याने बांगलादेशला दुसरा धक्का दिला आहे. शांतो अवघ्या 8 धावांवर बाद झालाय
भारताला पहिलं यश, कुलदीपने घेतली विकेट... तन्जिद हसन याला 51 धावांवर पाठवले तंबूत
सिराज आणि बुमराहची गोलंदाजाचा कोटा संपल्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी गिअर बदलला. सलामी फलंदाजांनी भारताची गोलंदाजी फोडून काढली. शार्दूल ठाकूर याच्या गोलंदाजीवर आक्रमक रुप घेतले. बांगलादेशने 14 षटकाबनंतर बिनबाद 90 धावा चोपल्या.
तन्जिद हसनचे अर्धशतक.. भारताची गोलंदाजी फोडली
संथ सुरुवातीनंतर बांगलादेशच्या सलामी फलंदाजांनी आक्रमक रुप धारण केले आहे. 12.4 षटकानंतर बांगलादेशने बिनबाद 80 धावा केल्या आहेत.
गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे. चेंडू अडवताना हार्दिकच्या पाय दुखावला. मैदानात डॉक्टरकडून उपचार सुरु
प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाने संयमी सुरुवात केली आहे. 8 षटकानंतर बिनबाद 37 धावा फलकावर लावल्या आहेत.
चार षटकानंतर बांगलादेशची धावसंख्या 10
लिट्टन दास, तंजीद हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), महमूदुल्लाह, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर
दुखापतीमुळे शाकीब अल हसन भारताविरोधात प्लेईंग 11 मध्ये खेळणार नाही. शांतो नाणेफेकीसाठी मैदानात आला. शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशने नाणेफेक जिंकली
शार्दूल ठाकूरच्या जागी मोहम्मद शामीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
थोड्याच वेळात होणार नाणेफेक..
पार्श्वभूमी
India vs Bangladesh LIVE Score: एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील सामना 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय संघ (Team India) ने एकदिवसीय विश्वचषकात (ODI World Cup) आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत (World Cup Points Table) दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजयाची हॅटट्रिक केली असून आता लक्ष्य गुणतालिकेतील अव्वल स्थानावर आहे. त्यासाठी बांगलादेश विरोधातील सामना जिंकणं आवश्यक आहे.
भारत सलग चौथा विजय मिळवणार?
टीम इंडिया खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विश्वचषक 2023 मध्ये भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी दिसून येत आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात चार सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने तीन सामने जिंकले आहेत आणि बांगलादेशने एक सामना जिंकला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आजचा सामना पुण्यातील एमसीए स्टेडिअमवर रंगणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार असून त्याआधी 1.30 वाजता नाणेफेक होईल.
फलंदाजीसाठी पोषक की गोलंदाज ठरणार घातक?
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. हे मैदान लहान आकाराचं आहे. छोटं मैदान असल्यामुळेही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. या खेळपट्टीवर संपूर्ण सामन्यात धावा करणं खूप सोपं आहे. या खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळाल्याने येथे सहज मोठे फटके मारता येतात. याशिवाय ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठीही योग्य आहे. या मैदानावर आतापर्यंत 7 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये संघांनी 8 वेळा 300 हून अधिक धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात चाहत्यांना मोठी धावसंख्या पाहायला मिळतील. दरम्यान, ही खेळपट्टी यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच वापरली जात आहे.
कशी आहे एमसीए स्टेडियमची खेळपट्टी?
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 7 एकदिवसीय सामन्यांपैकी 4 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत आणि 3 सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 307 आहे. त्याच वेळी, नंतर फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 281 धावा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की एकदिवसीय सामन्यात एकदाही 225 पेक्षा कमी धावा केल्या नाहीत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -