Maharashtra Rain Damage: महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात पावसाचे थैमान चालू असून, पुर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील 1,785,714 हेक्टर (4,284,846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या काळात प्रामुख्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासोबतच भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद यांनाही मोठा फटका बसला आहे.

Continues below advertisement


कृषिमंत्री काय म्हणाले?


“ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


राज्यात पावसाचे थैमान चालू असून गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांतील 195 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


सर्वाधिक नुकसान कुठे?


सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे नांदेड (728,049 हेक्टर), यवतमाळ (318,860 हेक्टर), वाशीम (203,098 हेक्टर), धाराशिव (157,610 हेक्टर), अकोला (177,466 हेक्टर), सोलापूर (47,266 हेक्टर) आणि बुलढाणा (89,782 हेक्टर) आहेत.राज्यातील एकूण 195 तालुक्यांमध्ये या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून 654 महसूल मंडळांतील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


बाधित पिके: सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.


कृषीमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले की, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांना आर्थिक तसेच तांत्रिक मदत मिळेल. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी धैर्य गमावू नये, योग्य मार्गदर्शन घेऊन आपली शेती सुधारण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या या मोठ्या नुकसानामुळे शेतकरी आणि राज्यासाठी मोठा आव्हान उभा राहिला आहे. मात्र, योग्य वेळेत नुकसानभरपाई, मदत आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक संकट कमी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा 


शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी ते शेतमालाचे दर, बच्चू कडूंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीका