India vs Australia 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका आता रोमांचक वळणावर पोहोचली आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 असा विजय मिळवला आहे. तिसरा कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जाईल. ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही डावात भारताची फलंदाजी फेल ठरले. याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की टीम इंडियाला दोन्ही डावांत 90 षटकेही खेळता आली नाहीत.


ॲडलेड कसोटीत तीन दिवसांत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आता अॅक्शन मोडवर आले आहेत. दुसरी कसोटी संपताच त्याने खेळाडूंना विश्रांती न घेता सराव करण्यास सांगितले. यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सीनियर खेळाडू नेटमध्ये मेहनत करताना दिसले.






ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेडमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा वाईटरित्या फ्लॉप ठरले. पहिल्या डावात 7 धावा आणि दुसऱ्या डावात 11 धावा केल्यानंतर कोहली आऊट झाला. रोहित शर्माचीही तीच अवस्था होती. भारतीय कर्णधार पहिल्या डावात 31 धावा आणि दुसऱ्या डावात 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ॲडलेडमधील लाजिरवाण्या पराभवानंतर या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या 13 कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर रोहितची सरासरी 13.1 आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत विराट कोहलीने शतक झळकावले होते, मात्र यंदा त्याची सरासरी 26.6 इतकी आहे.


रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या दोघांना विश्रांती दिली नाही. मंगळवारी सकाळी ॲडलेडमधून एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा जोरदार सराव करताना दिसत आहेत. यावेळी गंभीरची या दोघांवर बारीक नजर होती.


विराट आणि रोहित व्यतिरिक्त सलामीवीर यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि केएल राहुल देखील प्रशिक्षक गौतम गंभीरच्या देखरेखीखाली ॲडलेडमध्ये भरपूर घाम गाळताना दिसले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना पहाटे 5.50 वाजता सुरू होईल.






हे ही वाचा -


क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! 'या' मोठ्या लीगवर ICC कडून थेट बंदी; जाणून घ्या नेमकं कारण काय?