USA's National Cricket League Banned : क्रिकेटची लोकप्रियता पाहून आयसीसी अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या क्रिकेट लीगचे आयोजन करते. वर्षभरापूर्वी आयसीसीने नॅशनल क्रिकेट लीग ऑफ यूएसएला मान्यता दिली होती, मात्र आता अवघ्या वर्षभरातच आयसीसीने या क्रिकेट लीगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अमेरिकेतील राष्ट्रीय क्रिकेट लीगला मोठा धक्का दिला आहे. वसिकम अक्रम आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांसारख्या दिग्गजांचाही या लीगशी थेट संबंध आहे. एका नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयसीसीने अमेरिकेच्या क्रिकेट लीगवर बंदी घातली आहे. आयसीसीने पुढील हंगामाला मान्यता देण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. कारण यामध्ये नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. एका चुकीमुळे या अमेरिकन क्रिकेट लीगचे मोठे नुकसान झाले आहे.
लीगवर बंदी का घालण्यात आली?
अमेरिकेच्या नॅशनल क्रिकेट लीगमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आयसीसीने कठोर कारवाई करत लीगवर बंदी घातली आहे. नियमांनुसार, या लीगमधील प्रत्येक संघासाठी 7 अमेरिकन खेळाडू आणि 4 परदेशी खेळाडू असणे अनिवार्य आहे. मात्र संघांनी या नियमाचे उल्लंघन केले. हा नियम मोडल्याची माहिती आयसीसीला आधीच मिळाली होती. याशिवाय व्हिसाच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले. आयसीसीनेही उशीर न करता लीगवर बंदी घातली. आयसीसीने पत्र लिहून अमेरिकेच्या क्रिकेट लीगवर बंदी घालण्याची माहिती दिली. अशा स्थितीत नॅशनल क्रिकेट लीगच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार नाही.
वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्स आणि पाकिस्तानचे माजी दिग्गज वसीम अक्रम यांना यूएसए नॅशनल क्रिकेट लीगचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले होते. दुसरीकडे, आयसीसीनेही बंदीबाबत पत्र जारी केले आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, या स्पर्धेत अकरा खेळाडूंचे नियम पाळले गेले नाहीत. याशिवाय या लीगबाबत मैदानाबाहेरही अनेक समस्या आहेत.
हे ही वाचा -