एक्स्प्लोर

IND vs AUS, Toss Update : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

India vs Australia, ODI : मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली एकदिवसीय लढत रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच सामना आहे.

IND vs AUS, ODI Match Toss : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आजपासून (17 मार्च) एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होत आहे पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात (Wankhede Stadium) सुरु होत असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाचा आजच्या सामन्यासाठीचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक (Toss) जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याने एक मोठी धावसंख्या उभा राहू शकते. पण अशातच धावांचा पाठलागही केला जाऊ शकत असल्याने पांड्याने हा धाडसी निर्णय घेतला आहे. 

भारतीय संघाचा विचार केल्यास रोहित शर्मा सोडता इतर दमदार आणि दिग्गज खेळाडू संघात आहेत. विराट कोहलीही संघात असून विशेष म्हणजे केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजीला येणार आहे. कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूरही बऱ्याच काळानंतर संघात परतत आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत वैयक्तिक कारणांमुळे नियमित कर्णधार रोहित शर्मा गैरहजर आहे. त्यामुळे त्याच्या जागी हार्दिक पांड्या पहिल्या वनडेत कर्णधारपद सांभाळत आहे. हार्दिक वनडेत भारताची धुरा सांभाळण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी त्याने टी-20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत त्याने टीम इंडियाच्या बॉलिंग युनिटला पाठिंबा दिला आहे.

कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?

भारतीय संघ : शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया संघ : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशॅग्ने, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

कुठे पाहाल लाईव्ह स्ट्रिमिंग?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 या चॅनेलवर दुपारी 1.00 वाजता सुरु होईल. तसंच या सामन्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या अॅप आणि वेबसाइटवरुन पाहता येईल.

कसोटी मालिका जिंकून आता लक्ष्य एकदिवसीय मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाने (Team India) मालिका 2-1 ने जिंकत बॉर्डर-गावस्कर (BGT 2023) ट्रॉफी खिशात घातली. चौथा सामना अनिर्णित ठरला असला तरी मालिका भारतानेच जिंकली.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Dravid News : विराट कोहलीला नाकारलं, बेस्ट कॅप्टन म्हणून पाकिस्तानच्या खेळाडूला निवडलं; राहुल द्रविडच्या निर्णयाने सगळेच चक्रावले
विराट कोहलीला नाकारलं, बेस्ट कॅप्टन म्हणून पाकिस्तानच्या खेळाडूला निवडलं; राहुल द्रविडच्या निर्णयाने सगळेच चक्रावले
IND vs AFG LIVE Streaming : ना JioHotstar, ना Sony LIV...; मग भारत-अफगाणिस्तान पहिली टी-20 मॅच नक्की LIVE कुठे पाहायची? जाणून घ्या A टू Z
ना JioHotstar, ना Sony LIV...; मग भारत-अफगाणिस्तान पहिली टी-20 मॅच नक्की LIVE कुठे पाहायची? जाणून घ्या A टू Z
S Sreesanth Father Dies : क्रिकेटपटू श्रीसंतचा खंदा आधार हरपला, वडिलांचे निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्रिकेटपटू श्रीसंतचा खंदा आधार हरपला, वडिलांचे निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ind vs Afg 1st T20 Playing XI : इशान किशन OUT, तर संजू सॅमसन IN... शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट, अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
इशान किशन OUT, तर संजू सॅमसन IN... शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट, अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget