Ind vs Aus Semi-Final Score : किंग कोहलीने दिलं ऑस्ट्रेलियाला रिटर्नचं तिकीट, भारताचा धडाकेबाज विजय; थेट फायनलमध्ये विराजमान!
India vs Australia Scorecard Update : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला.
भारताने ऑस्ट्रेलियाला रिटर्नचं तिकीट दिले आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला आणि थेट फायनलमध्ये विराजमान झाले. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडशी होऊ शकतो. भारताच्या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 84 धावांची खेळी खेळून टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पण, या काळात कोहलीचे शतक 16 धावांनी हुकले. भारतीय संघाने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. भारत अंतिम फेरीत पोहोचल्याने आता अंतिम सामना दुबईमध्ये होणार हे निश्चित झाले आहे. भारत पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.
विराट कोहलीच्या रूपाने भारतीय संघाला पाचवा धक्का बसला आहे. कोहली हळूहळू त्याच्या शतकाकडे वाटचाल करत होता, पण अॅडम झंपाच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. 98 चेंडूत पाच चौकारांसह 84 धावा काढल्यानंतर कोहली बाद झाला. 43 षटकांत भारताने पाच बाद 226 धावा केल्या आणि विजयासाठी 42 चेंडूत 39 धावांची आवश्यकता होती.
विराट कोहलीच्या रूपाने भारतीय संघाला पाचवा धक्का बसला आहे. कोहली हळूहळू त्याच्या शतकाकडे वाटचाल करत होता, पण अॅडम झंपाच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली.
वेगवान गोलंदाज नाथन एलिसने अक्षर पटेलला बाद करून भारताला चौथा धक्का दिला. अक्षर पटेल 30 चेंडूत 27 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताला आता जिंकण्यासाठी 84 चेंडूत 82 धावा करायच्या आहेत.
श्रेयस अय्यरला बाद करून अॅडम झम्पाने भारताला तिसरा धक्का दिला आहे. श्रेयस चांगली फलंदाजी करत होता आणि अर्धशतकाकडे वाटचाल करत होता. पण झंपाने त्याला बाद केले. श्रेयस आणि कोहलीमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. कोहलीने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 80 पेक्षा जास्त धावांची भागीदारीही पूर्ण केली आहे. कोहलीने 53 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले जे त्याच्या कारकिर्दीतील 74 वे अर्धशतक आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने भारताने आपला दुसरा विकेट गमावला आहे. रोहितने 29 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 28 धावा काढल्या आणि तो बाद झाला.
पाचव्या षटकात शुभमन गिलच्या रूपात भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. 11 चेंडूत एका चौकारासह 8 धावा काढल्यानंतर गिल आऊट झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव सुरू झाला आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत फलंदाजीसाठी शुभमन गिल मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत भारतासमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्मिथच्या 96 चेंडूत 73 धावा आणि अॅलेक्स कॅरीच्या 57 चेंडूत 61 धावांच्या मदतीने 49.3 षटकांत 264 धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
अॅलेक्स कॅरी धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने 249 धावांत आठ विकेट गमावल्या. कॅरी शानदार फलंदाजी करत होता पण श्रेयसच्या रॉकेट थ्रोमुळे त्याने आपली विकेट गमावली. 57 चेंडूत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 61 धावा काढल्यानंतर कॅरी बाद झाला.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कर्णधार स्टीव्ह स्मिथला बाद करून ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. स्मिथ चांगली फलंदाजी करत होता, पण शमीने स्मिथला बाद करून भारताला सुटकेचा नि:श्वास सोडला. स्मिथने 96 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह 73 धावा काढल्या आणि तो बाद झाला. स्मिथने अॅलेक्स कॅरीसोबत पाचव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली.
भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धावसंख्या 180 धावांच्या पुढे गेली आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथची शानदार फलंदाजी सुरूच आहे आणि त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. दुसऱ्या टोकाला त्याला पाठिंबा देण्यासाठी अॅलेक्स कॅरी आहे.
रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाला चौथा धक्काही दिला. त्याने जोश इंग्लिसची त्याने शिकार केली. तो फक्त 11 धावा करून बाद झाला. अॅलेक्स कॅरी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. 27 षटकांनंतर धावसंख्या 144/4 आहे.
रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्याने मार्नस लाबुशेनला एलबीडब्ल्यू बाद केले. ३० वर्षीय फलंदाज उत्तम फॉर्ममध्ये दिसत होता. हेड बाद झाल्यानंतर त्याने स्टीव्ह स्मिथसोबत तिसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. 24 षटकांनंतर धावसंख्या 120/3 आहे.
कूपर कॉनोली आणि हेड आऊट झाल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन क्रीजवर उपस्थित आहेत. 18 षटकांच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावून 91 धावा केल्या आहेत. भारताने आतापर्यंत दोन यश मिळवले आहेत.
फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला बाद करून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. हेड तुफानी फटकेबाजी करत होता, पण वरुणच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. हेडने 33 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह 39 धावा काढल्यानंतर बाद झाला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 54 धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत. सध्या मार्नस लाबुशेन आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ क्रीजवर आहेत.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात सलामीवीर कूपर कॉनोलीला आऊट करून भारताला पहिले यश मिळवून दिले. कॉनोली नऊ चेंडू खेळून खाते न उघडता बाद झाला.
भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारू संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी ट्रॅव्हिस हेड आणि कूपर कॉनोली मैदानावर आले आहेत. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आला आहे. पण त्याने पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडचा कॅच सोडला.
ऑस्ट्रेलिया : कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, तनवीर संघा.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे, भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सलग 14 व्यांदा नाणेफेक गमावली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग-11मध्ये दोन बदल केले आहेत. मॅथ्यू शॉर्टची जागा कूपर कॉनोलीने घेतली आहे, तर स्पेन्सर जॉन्सनच्या जागी तनवीर संघा आला आहे. भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. याचा अर्थ असा की या सामन्यातही संघ चार फिरकीपटूंसह खेळेल.
पार्श्वभूमी
India vs Australia 1st Semi-Final Champions Trophy 2025 Score : विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आणि सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार मोहम्मद शमी आणि विराट कोहली होते, ज्यांनी त्यांच्या दमदार कामगिरीने ऑस्ट्रेलियाला रिटर्नचं तिकीट दिले. शमीने 4 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 264 धावांवर रोखले.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय संघाने 14 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यश मिळवले. 2011 च्या वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर जेतेपदही जिंकले. यावेळी, टीम इंडिया जेतेपदाच्या अगदी जवळ आली आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर काढले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -