IND Vs AUS | फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरही रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठीचा प्रवास खडतर
IND vs AUS : भारताचा हिटमॅन रोहित शर्मा फिट असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांकडून कळलं आहे. रोहितने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी दिली. यात तो उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. परंतु, तरिदेखील रोहित कसोटी मालिका खेळू शकेल की, नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.
IND vs AUS : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास झाला असून ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियासोबत कसोटी सामन्यात खेळण्यासाठी तयार आहे, बीसीसीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे की, 14 डिसेंबर रोजी रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. परंतु, रोहित शर्मासाठी अद्यापही ऑस्ट्रेलियासोबतच्या कसोटी सामन्यात खेळण्याचा मार्ग सोपा नाही.
भारताचा हिटमॅन रोहित शर्मा फिट असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांकडून कळलं आहे. रोहितने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी दिली. यात तो उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. परंतु, तरिदेखील रोहित कसोटी मालिका खेळू शकेल की, नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कठोर नियमावलीमुळे ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर रोहित शर्माला 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने सांगितलं की, "रोहित शर्माचा क्वॉरंटाईनचा काळ पूर्ण झाल्यानंतर त्याची आणखी एक फिटनेस टेस्ट करण्यात येणार आहे. बीसीसीआयने सांगितलं की, "भारतीय टीमचा फलंदाज रोहित शर्माने बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीमध्ये आपली रिहॅब प्रक्रिया पूर्ण केली असून आता तो फिट आहे."
रोहितला आयपीएलमध्ये दुखापत झाल्यामुळे तो 19 नोव्हेंबरपासून रिकव्हरीसाठी एनसीएमध्ये रिहॅबमध्ये होता. मीडिया रिपोर्टनुसार, एनसीएची मेडिकल टीम रोहितच्या फिजिकल फिटनेसमुळे पूर्णपणे संतुष्ट आहे. मेडिकल टीमने फलंदाजी, फिल्डिंग आणि विकेट्स यांसारख्या परीक्षा घेतल्या आहेत. त्यानंतर रोहित खेळण्यासाठी पूर्णपणे फिट असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियात खेळणं अद्याप स्पष्ट नाही
ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाल्यानंतर रोहितला दोन आठवड्यांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागणार असून त्यानंतरच तो टीम इंडियासोबत खेळू शकतो. असं सांगितलं जात आहे की, "दोन आठवड्यांसाठी क्वॉरंटाईन राहण्यासाठी त्याला सविस्तर प्रोग्राम देण्यात आला आहे. क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर मेडिकल टीम पुन्हा एकदा त्याची फिटनेस टेस्ट घेणार आहेत. त्यानंतरच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहितला सहभागी होता येणार आहे."
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली त्यावेळी रोहितचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणाऱ्या टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. परंतु, त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये खेळण्यासाठी रोहितचा संघात समावेश करण्यात आला. असं सांगण्यात येत आहे की, विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळणार नाही, त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माची हजेरी टीम इंडियासाठी दिलासा ठरु शकते.
महत्त्वाच्या बातम्या :