एक्स्प्लोर

IND vs AUS : ऑस्ट्रेलियात भारतीय खेळाडूंशी पुन्हा गैरवर्तन; सिराज, सुंदरला प्रेक्षकांकडून शिवीगाळ

यापूर्वी सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना उद्देशून वर्णद्वेषाचे भाष्य केले होते. या दोघांनीही याबाबत पंचांकडे तक्रार केली होती.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंसोबत गैरवर्तन करण्यात आलं आहे. ब्रिस्बेनच्या गाब्बा मैदानावर खेळल्या जाणार्‍या चौथ्या कसोटी सामन्यात काही प्रेक्षकांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला उद्देशून अपशब्द वापरले आहेत. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या बातमीतून ही माहिती उघड झाली आहे.

मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर फिल्डिंगसाठी बाऊंड्री लाईनवर उभे असताना हा सगळा प्रकार घडला आहे. काही प्रेक्षक जोरजोरात दोघांना उद्देशून शिवीगाळ करत होते. दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियन दर्शकांनी अपशब्द वापरले आहेत.

सिडनी कसोटीतही खेळाडूंसोबत गैरवर्तन

यापूर्वी सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना उद्देशून वर्णद्वेषाचे भाष्य केले होते. या दोघांनीही याबाबत पंचांकडे तक्रार केली होती. यानंतर, दुसऱ्या डावातही प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजला शिवीगाळ केली होती. त्यानंतर सुमारे 10 मिनिटे खेळ थांबवावा लागला होता. त्यावेळी सहा प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर काढण्यात आलं होतं.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा

भारतीय खेळाडूंशी गैरवर्तन केल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही दिलगिरी व्यक्त केली होती. यासह ऑस्ट्रेलियन संघाचा प्रशिक्षक जस्टीन लँगर आणि कर्णधार टिम पेन यांनीही ही घटना लाजिरवाणी असल्याचं म्हटलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी ) क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निषेध केला होता आणि हा भेदभाव सहन करणार नाही असं म्हटलं होतं. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.

चौथ्या कसोटीचा पहिला दिवस

गब्बाच्या वेगवान विकेटवर ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली आणि अवघ्या 13 धावांच्या मोबदल्यात त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. पण यानंतर मार्लनस लब्युचेन 108, स्टीव्ह स्मिथ 36 आणि मॅथ्यू वेड 45 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाच विकेटच्या मोबदल्यात 274 धावा केल्या आहेत. कर्णधार टिम पेन 38 आणि कॅमेरून ग्रीन 28 धावांवर खेळत आहेत. टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने भारताकडून सर्वाधिक दोन गडी बाद केले. याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12  डिसेंबर 2024 : ABP MajhaAtul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट 
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचं पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्याचं नियोजन 
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Embed widget