मुंबई : गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर (Narendra Modi Stadium) 19 नोव्हेंबर रोजी आयसीसीच्या विश्वचषकाच्या (World Cup 2023) स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने (Australia) भारतावर 6 विकेट्सनी मात केली. दरम्यान यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'प्रिय टीम इंडिया, विश्वचषकाच्या स्पर्धेदरम्यान तुमची प्रतिभा आणि जिद्द उल्लेखनीय होती. तुम्ही मोठ्या जिद्दीने खेळलात आणि देशाला कायमच तुमचा अभिमान वाटेल. आम्ही आज आणि नेहमीच तुमच्या सोबत उभे आहोत.' 






ऑस्ट्रेलियाच्या संघाचे अभिनंदन


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे देखील अभिनंदन केले आहे. ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, विश्वचषकातील शानदार विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी प्रशंसनीय होती, ज्याची पराकाष्ठा झाल्याने तुम्हाला दणदणीत विजय मिळाला. ट्रॅव्हिस हेडचे आजच्या उल्लेखनीय खेळाबद्दल अभिनंदन.






भारताचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं


भारताने दिलेल्या 241 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वादळी सुरुवात केली. डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी पहिल्याच षटकात 15 धावा वसूल करत इरादे स्पष्ट केले होते. पण मोहम्मद शामीने दुसऱ्याच षटकात डेविड वॉर्नरचा अडथळा दूर केला. डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्शही फार काळ तग धरु शकला नाही. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श याचा अडथळा दूर केला. मिचेल मार्शने 15 चेंडूत 15 धावा केल्या. त्याने या छोटेखानी खेळीत एक चौकार आणि एक षटाकर ठोकला. स्टिव्ह स्मिथ याला लौकिकास साजेशी खेली करता आली नाही. स्मिथ फक्त चार धावांवर बाद झाला. स्मिथचा अडथळा बुमराहने दूर केला. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी 192 धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 


 


हेही वाचा : 


IND vs AUS Final 2023: हेड डोकेदुखी ठरला, ऑस्ट्रेलियाने चषकावर कोरले नाव, भारताचं स्वप्न भंगलं