India vs Australia 2023 World Cup Final : गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियवमवर पोहोचले आहेत. पीएम मोदी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे की 140 कोटी भारतीय टीम इंडियाचा जयजयकार करत आहेत. पीएम मोदींनी लिहिले की, "टीम इंडियाचे अभिनंदन, 140 कोटी भारतीय तुमचा जयजयकार करत आहेत. तुम्ही चांगले खेळा आणि खेळभावना कायम ठेवा."
अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा फायनल खेळला जात आहे. त्याच वेळी, या सामन्याच्या मध्य-इनिंग ब्रेक दरम्यान, प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती आणि जोनिता गांधी यांच्या कामगिरीने चाहते मंत्रमुग्ध झाले. या दोघांशिवाय नकाश अजीज, अमित मिश्रा, आकाश सिंग आणि तुषार जोशी यांनी आपली जादू पसरवली. तसेच, नेत्रदीपक लेझर शो पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मिड इनिंग ब्रेक परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांना या स्टार्सचे व्हिडिओ खूप आवडत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य आहे. वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 36 षटकांत 3 बाद 195 धावा आहे. सध्या ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन क्रीजवर आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांच्यात 162 चेंडूत 138 धावांची भागीदारी आहे. ट्रॅव्हिस हेड शतक करून खेळत आहे. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली होती. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 240 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली आणि केएल राहुलने अर्धशतकी खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या