India vs Australia 2023 World Cup Final : वर्ल्डकप सुरू झाल्यापासून ते पार फायनलपर्यंत टीम इंडियाने स्वप्नवत कामगिरी करत सर्व टीमला लोळवत अंतिम फेरीत दिमाखा प्रवेश केला. मात्र एका अवसानघातकी खेळीमुळे टीम इंडियाला वर्ल्डकप मायदेशात जिंकण्यात अपयश आलं आहे. अवघ्या 240 धावांचा आव्हान घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने अवघ्या चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये पार करताना भारतापासून विश्वचषक दूर नेला.
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर हेड भारताच्या विजयातील कर्दनकाळ ठरला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर हेड भारताच्या विजयातील कर्दनकाळ ठरला.
एक वेळ तीन बाद 47 अशी स्थिती ऑस्ट्रेलियाची होती. तेथून काहीतरी चमत्कार होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र ही सर्व अपेक्षा लॅब्युशेन आणि हेडने धुळीस मिळवताना टीम इंडियाच्या गोलंदाजीवर कडाडून प्रहार करत विजयश्री खेचून आणली.
ज्या टीम इंडियाला या वर्ल्डकपचा विजयाचा दावेदार मानला जात होता तो टीम इंडियाचा संघ आज ऑस्ट्रेलियासमोर पूर्णतः हतबल दिसून आली. जी देहबोली मागील 10 सामन्यांमध्ये दिसून आली ती फायनलमध्ये कुठे दिसून आली नाही.
पहिल्या 10 षटकांमध्ये दमदार खेळ केल्यानंतर नंतरच्या 40 षटकांमध्ये टीम इंडियाची जी फलंदाजीमध्ये वाहतात झाली, तीच पराभवाची कारणीभूत ठरली. तरीही टीम इंडियाची गोलंदाजी पाहता काहीतरी चमत्कार होईल अपेक्षा होती. मात्र, तसं काहीच होऊ शकलं नाही.