(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS Final: शामीने केवळ 52 चेंडूत 8 डावखुऱ्यांना तंबूत धाडलं, आता ऑस्ट्रेलियन सलामीवीरांचा नंबर
Mohammed Shami : मोहम्मद शामीच्या माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज नांगी टाकतात. शामीने 6 सामन्यात तब्बल 23 फलंदाजांची शिकार केली आहे.
Mohammed Shami vs David Warner/Travis Head : विश्वचषकाच्या रणांगणात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मेगाफायनल होणार आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालेय. ऑस्ट्रेलियाच्या भक्कम फलंदाजीला रोखण्याची आव्हान भारताच्या गोलंदाजांपुढे आव्हान असेल. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील भारतीय गोलंदाजी विश्वचषकात वरचढ ठरली आहे. सेमीफायनलचा अपवाद वगळता 9 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला 275 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. मोहम्मद शामीच्या माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज नांगी टाकतात. शामीने 6 सामन्यात तब्बल 23 फलंदाजांची शिकार केली आहे. शामीची लाईन लेंथ प्रतिस्पर्धी फलंदाजासाठी कोडे झालेय. भारतीय संघाच्या तिकडीसमोर दिग्गजही ढेपाळले आहेत. पण ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज सध्या भन्नाट फॉर्मात आहेत.
डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांना बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा सामना करणं तितके कठीण नाही. जसप्रीत बुमराह याला आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये एकदाही वॉर्नरला बाद करता आले नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांना सर्वात जास्त धोका मोहम्मद शामी याच्याकडून आहे. विश्वचषकात मोहम्मद शामी डावखुऱ्या फलंदाजाचा कर्दनकाळ ठरलाय. विश्वचषकात मोहम्मद शामी याने फक्त 52 चेंडूमध्ये आठ डावखुऱ्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. यादरम्यान शामीने फक्त 32 धावा खर्च केल्या आहेत. या आकड्यावरुन डावखुऱ्या फलंदाजांविरोधात शामीच्या विध्वंसक कामगिरीचा अंदाज लावू शकता.
वॉर्नर आणि हेडची कमकुवत बाजू
डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड हे दोन्ही फलंदाज डावखुरे फलंदाज आहे. आउटसाइड ऑफ स्टम्पवर असलेल्या चेंडूवर खेळताना ट्रेविस हेड अडखळतो. तर डेविड वॉर्नर अराऊंड द विकेट अँगलवरुन येणाऱ्या चेंडूवर फसतो. शामी या दोन्ही लाईन लेंथवर गोलंदाजी करण्यास तरबेज आहे. शामी यंदाच्या विश्वचषकात फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलाय. नव्या चेंडूवर भेदक मारा करत शामी हेड आणि वॉर्नरला तंबूत पाठवू शकतो.
विश्वचषकात शामीची आग ओखणारी गोलंदाजी -
यंदाच्या विश्वचषकात शामी आग ओखणारी गोलंदाजी करतोय.त्याने फक्त 6 सामन्यात 23 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. यादरम्यान त्याने 9.13 च्या शानदार गोलंदाजी सरासरीने आणि 10.91 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजी केली. म्हणजेच, प्रत्येक 10 धावानंतर आणि 11 व्या चेंडूनंतर शामी विकेट घेतोय. विश्वचषकाच्या फायनलमध्येही शामी आग ओखणारी गोलंदाजी करेल आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावेल.
आणखी वाचा :
दिल कहता है ऑस्ट्रेलिया, पर दिमाग बोल रहा है इंडिया... ऑसी खेळाडूचा फायनलआधी अंदाज