एक्स्प्लोर

IND vs AUS Final: इतिहास सांगतोय, ज्या ज्या वेळी फायनलला टॉस हरला, त्या त्यावेळी भारताने वर्ल्डकप जिंकला 

IND vs AUS Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेकीचा कौल जिंकला. नाणेफेकीचा योगायोग समोर आलाय.

IND vs AUS Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेकीचा कौल जिंकला. कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. नाणेफेक झाल्यानंतर एक अजब योगायोग समोर आला.  फायनलमध्ये भारताने जेव्हा जेव्हा नाणेफेक गमावली, तेव्हा तेव्हा भारताने विश्वचषक उंचावलाय. 1983 आणि 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाने नाणेफेक गमावली होती. पण टीम इंडियाने विश्वचषक उंचावला होता. आजही रोहित शर्माने नाणेफेक गमावली, त्यानंतर भारतीय संघाच्या चषक विजयाची शक्यता आणखी वाढली. 

योगायोग काय जुळून आला - 

1983 - भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांनी विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेक गमावली होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना फलंदाजी करताना 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजचा संघ 140 धावांत ऑलआऊट झाला होता. मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.   

2011 - विश्वचषकात एमएस धोनीने नाणेफेक गमावली होती. कुमार संगाकाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताल होता. जयवर्दनेच्या शतकाच्या बळावर लंकेने 277 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान सहा विकेटच्या मोबदल्यात पार पाडले. एमएस धोनी आणि गौतम गंभीर यांनी शानदार खेळी केली होती. धोनीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 

2023 - आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये रोहित शर्माने नाणेफेक गमावली आहे. पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. 

आणखी एक योगायोग - 


2003 Final - विश्वचषकाच्या फायनलमध्ये सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना दोन विकेट्सच्या मोबदल्यात 359 धावांचा डोंगर उभारला होता. पॉटिंगने शतक ठोकले होते. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ 234 धावांपर्यंत मजल मारु शकला. 

2023 Final - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याकडून आक्रमक सुरुवात मिळाली आहे. आजच्या सामन्यातही नाणेफेक गमावणारा संघ चषक उंचावणार का? 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

युझवेंद्र चहलने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच गोलंदाज, नेमका काय आहे विक्रम? 
युझवेंद्र चहलने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच गोलंदाज, नेमका काय आहे विक्रम? 
IND vs NZ : मोहम्मद सिराजला पहिल्या कसोटीबाहेर ठेवल्यानं माजी क्रिकेटपटूंची टीकेची झोड, अखेर टीम इंडियाच्या प्रशिक्षकानं उत्तर दिलं...
भारताची दमदार सुरुवात पण न्यूझीलंडचा पलटवार, सिराजला संघाबाहेर ठेवल्यानं वादाचा भडका, भारताचा कोच म्हणाला...
Asia Cup Rising Stars 2026: आशिया कपचा थरार आजपासून! वैभव-अभिषेकचा धुमाकूळ पाहायला मिळणार, IND vs PAK महामुकाबला कधी? टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर
आशिया कपचा थरार आजपासून! वैभव-अभिषेकचा धुमाकूळ पाहायला मिळणार, IND vs PAK महामुकाबला कधी? टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर
IND vs NZ 1st Test Day-1 : पंतने दिला इशारा, पडिक्कलने हातात आलेला झेल सोडला! निकोल्सला जीवदान, शुभमन गिल भडकला; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
पंतने दिला इशारा, पडिक्कलने हातात आलेला झेल सोडला! निकोल्सला जीवदान, शुभमन गिल भडकला; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget