IND vs AUS : अहमदाबाद कसोटीत अक्षर पटेलचा डबल धमाका, अशी कामगिरी करणारा भारताचा पहिलाच गोलंदाज
Ahemdabad Test: अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत एक खास रेकॉर्ड नावावर करत कसोटी क्रिकेटमध्ये 500 धावा आणि 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
Axar Patel in IND vs AUS Test : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं (Axar patel) ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत (IND vs AUS 4th Test) दुहेरी यश मिळवलं. सामन्यात त्याने 79 धावांची शानदार खेळी केली होती. ज्या मदतीने अक्षरने कसोटी क्रिकेटमध्ये 500 धावाही पूर्ण केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या डावात विकेट घेताच तो काही खास क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला. जगभरातील काही निवडक क्रिकेटपटूंच्या शेवटच्या 12 सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला, तर अक्षर पटेल हा कसोटीत 50 बळी आणि 500 धावा करणारा केवळ पाचवा क्रिकेटर आहे.
जगातील पाचवा क्रिकेटपटू
अक्षर पटेल हा 12 कसोटी सामन्यांमध्ये 500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा आणि 50 बळी घेणारा जगातील केवळ पाचवा क्रिकेटर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या जॅक ग्रेगरीचे नाव अग्रस्थानी आहे. त्याने 12 कसोटीत 744 धावा करण्यासोबतच 57 विकेट्स घेतल्या. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ऑब्रे फॉकनर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 12 कसोटीत 682 धावा करण्यासोबतच 52 विकेट्स घेतल्या. या यादीत भारताच्या आर अश्विनचेही नाव आहे. 12 कसोटीत 596 धावा करण्यासोबतच त्याने 63 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बॉथमने 12 कसोटीत 549 धावा देत 70 विकेट घेतल्या. अक्षर पटेलने 12 कसोटीत 513 धावा करण्यासोबतच 50 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा पहिला गोलंदाज
अक्षर पटेल हा भारतीय संघाचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज आहे ज्याने भारतासाठी सर्वात जलद 50 कसोटी बळी घेतले आहेत. अक्षरने 2021 साली चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून आजपर्यंतचे काही सामने सोडले तर तो सातत्याने भारताच्या कसोटी संघात राहिला आहे. अक्षरने भारतासाठी 12 कसोटी सामने खेळले आहेत. तो सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतो. अक्षर पटेलने टीम इंडियासाठी आतापर्यंत 12 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 40 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Milestone 🚨 - Congratulations @akshar2026 who is now the fastest Indian bowler to take 50 wickets in terms of balls bowled (2205).
— BCCI (@BCCI) March 13, 2023
Travis Head is his 50th Test victim.#INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/yAwGwVYmbo
अखेरचा सामना अनिर्णीत
सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतलेल्या ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत तब्बल 480 धावा स्कोरबोर्डवर लावल्यावर भारतानं चोख प्रत्यूत्तर देत शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या शतकाच्या मदतीनं 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. ज्यानतंर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 175 धावा केल्यावर दिवसाचा खेळ संपला ज्यामुळे कसोटी सामना अनिर्णीत राहिला.
हे देखील वाचा-