India vs Australia 4th Test : जस्सी जैसा कोई नहीं… टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी हा डायलॉग का वापरला जातो, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत पहिल्या दोन संघात यजमान भारतीय संघाचे पारडे जड दिसत होते. पण खेळाच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजांनी पुनरागमन केले आणि चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने कमाल केली. यांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाला मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. मेलबर्न कसोटी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 234 धावांवर ऑलआऊट झाला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे, ज्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव जास्त काळ टिकला नाही आणि भारताने लवकरच विकेट्स घेत डाव पूर्ण केला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 234 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर भारताने विजयासाठी 340 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी केवळ 6 धावांनी धावसंख्या वाढवली. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेण्यात यश मिळवले.
पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 228/9 धावसंख्येवरून डावाला सुरुवात केली. मोहम्मद सिराजने भारतासाठी गोलंदाजीची सुरुवात केली आणि त्याच्या षटकात एक चौकार आणि नंतर एक रन घेतला. अशा प्रकारे या षटकात एकूण 5 धावा आल्या. पुढच्या षटकात जसप्रीत बुमराह आला, त्याने पहिल्या तीन चेंडूत फक्त एक धाव दिली आणि नंतर चौथ्या चेंडूवर नॅथन लायनला बोल्ड करून ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. बुमराहच्या अँगल बॉलवर लायनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण तो बोल्ड झाला. अशाप्रकारे 55 चेंडूत 41 धावा करून लायन पॅव्हेलियनमध्ये परतला, तर स्कॉट बोलंड 15 धावा करून नाबाद राहिला.
जसप्रीत बुमराहचा 'पंजा'!
रविवारी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी करत 5 खेळाडूंची शिकार केली. बुमराहने आधी सॅम कॉन्स्टासला (8) आऊट केले. यानंतर ट्रॅव्हिस हेडची (1) सलग दुसऱ्यांदा शिकार केली आणि त्याला मोठी खेळी खेळण्याची संधी दिली नाही. त्यानंतर मिचेल मार्श (0) आणि ॲलेक्स कॅरी (2) आऊट झाले. मात्र, यानंतर नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलंड यांनी ऑस्ट्रेलियाची धुरा सांभाळली आणि बुमराहला पंजा उघडू दिला नाहीत, पण पाचव्या दिवशीही असे झाले नाही आणि भारतीय वेगवान गोलंदाजाने अवघ्या चार चेंडूत एक विकेट घेतली आणि पाच विकेट पुर्ण केल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीत 13व्यांदा विकेट घेण्याचा पराक्रम केला.