Hingoli Crime : हिंगोलीच्या वगरवाडी शिवारात आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये वाद झाल्याने प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तेलंगणातील आदिलाबाद मधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अधिकची माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील वगरवाडी शिवारामध्ये पाच दिवसांपूर्वी एका अनोळखी मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे शवाविच्छेदन केल्यानंतर खून करून कोणीतरी हा मृतदेह त्या ठिकाणी आणून टाकला होता असं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल केला आणि त्यावरून संबंधित हत्या करण्यात आलेल्या तरुणीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला. दरम्यान आता पाच दिवसांनी संबंधित मुलीची ओळख पटली असून अहिल्यानगर येथील जामखेड येथील अलका बेंद्रे नावाची ती मुलगी असल्याच पोलिसांना समजलं त्यावरून पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवली आहेत.
वादाच रूपांतर भांडणामध्ये प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून केला खून
मयत मुलीचे श्रीकांत पिनलवार याच्यासोबत प्रेम संबंध होते. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाले आणि या वादाच रूपांतर भांडणामध्ये झालं. याच भांडणामध्ये प्रियकर श्रीकांत पिनलवार याने संबंधित तरुणीचा गळा दाबून खून केला आणि ही डेड बॉडी वगरवाडी शिवारामध्ये आणून टाकली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करत आरोपी श्रीकांत पिनलवार याला तेलंगणातील आदिलाबाद येथून ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास हिंगोली पोलीस करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या