Ind vs Aus 3rd Test : गाबा कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियासमोर संकटाचे ढग, WTC फायनलचे गणित पुन्हा बिघडणार
Australia vs India 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मधील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Ind vs Aus 3rd Test Rain in Brisbane : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मधील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ब्रिस्बेनमध्ये सध्या पाऊस सुरू असून पुढील पाच दिवस सतत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बुधवारपर्यंत पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. हा कसोटी सामना शनिवार ते बुधवार या कालावधीत खेळवला जाणार आहे. आता ही कसोटी पावसामुळे वाहून गेली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या भारताच्या आशांनाही मोठा धक्का बसणार आहे. ब्रिस्बेनमधील कसोटी पावसामुळे वाहून गेल्यास समीकरणे काय असतील ते जाणून घेऊया.
3️⃣ Groups
— BCCI (@BCCI) December 13, 2024
1️⃣8️⃣ Maximum Balls
6️⃣ Targets 🎯
Who takes the win? 🤔
Watch 🎥 #TeamIndia's fun & creative fielding drill with Fielding Coach T Dilip ahead of the Gabba Test 👌👌#AUSvIND
टीम इंडियासमोर संकटाचे ढग
ब्रिस्बेनमध्ये होणारी कसोटी पावसामुळे वाहून गेली तर तो सामना अनिर्णित राहिल. अशा परिस्थितीत भारताच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशांना धक्का बसेल कारण भारताने मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकले तरी त्यांचे एकूण गुण 138 होतील आणि गुणांची टक्केवारी फक्त 60.52 होईल. या स्थितीत इतर संघांच्या निकालावर भारताचे भवितव्य पूर्णपणे अवलंबून असेल. कारण ऑस्ट्रेलियाचे श्रीलंकेत दोन सामने बाकी असतील आणि त्यात त्यांनी चांगली कामगिरी केल्यास पुनरागमनाची संधी असेल.
Adelaide ✅
— BCCI (@BCCI) December 11, 2024
Hello Brisbane 👋#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/V3QJc3fgfL
भारताची मालिका 3-1 ने जिंकण्याची शक्यता किती?
भारताने ही मालिका 3-1 ने जिंकल्यास त्यांच्या आशांना बळ मिळेल, पण असे करून ते दक्षिण आफ्रिकेचा मार्गही मोकळा करू शकतात. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-1 ने गमावली तर त्यांची गुणांची टक्केवारी 51.96 राहील. यानंतर त्याला श्रीलंकेला जाऊन दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. ही मालिकाच भारतासाठी महत्त्वाची ठरू शकते. श्रीलंकेने ही मालिका 2-0 ने जिंकल्यास ऑस्ट्रेलिया बाहेर जाईल. मालिका 2-0 ने जिंकल्यानंतरही श्रीलंकेच्या गुणांची टक्केवारी केवळ 53.84 वर पोहोचेल. जर ऑस्ट्रेलियाने मालिका 2-0 ने जिंकली तर त्यांच्या गुणांची टक्केवारीही केवळ 57.01 पर्यंत पोहोचेल.
हे ही वाचा -