(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS 2nd Test Highlights : दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस संपला, 263 धावांवर ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाल्यावर दिवसअखेर भारत 21/0
IND vs AUS, 2nd Test : सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला ज्यानंतर त्यांना पहिल्या डावात 263 धावाच करता आल्या. यात उस्मान ख्वाजाने 81 तर हँन्डकॉम्बने नाबाद 72 धावा केल्या.
IND vs AUS, 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये (Delhi Test) सुरु आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपला असून दिवसअखेर भारताची स्थिती 21 धावांवर शून्य बाद अशी आहे. भारत 242 धावांनी पिछाडीवर असून कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल क्रिजवर आहे. सर्वात आधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. ज्यानंतर त्यांचा पहिला डाव 263 धावांवर आटोपला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 81 तर हॅन्ड्सकॉम्बने नाबाद 72 धावांची खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 आणि अश्विन-जाडेजा जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर भारताने दिवसअखेर 21 धावा केल्या असून एकही विकेट गमावलेली नाही.
View this post on Instagram
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक होताच (Toss Update) ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं (Pat Cummines) फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या करण्याचा त्यांचा डाव होता. त्यानुसार त्यांनी पहिल्या डावात 263 धावा बोर्डवर लावल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि शेवटच्या षटकांत पीटर हॅन्ड्सकॉम्ब यांनी दमदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून सामन्यात काही चांगल्या पार्टनरशिप्स पाहायला मिळाल्या. सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 81 धावा, तसंच पॅट कमिन्सने 33 धावा केल्या. सर्वात उत्तम म्हणजे पीटर हॅन्ड्सकॉम्बने नाबाद 72 धावांची खेळी करत धावसंख्या किमान 250 च्या पुढे गेली आहे. भारताकडून मोहम्मद शमीने 14.4 षटकांत 60 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तर अश्विन आणि जाडेजा यांनी प्रत्येकी 21 षटकं टाकत अनुक्रमे 57 आणि 68 धावा देत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियन संघात 4 फिरकीपटूंचा समावेश
दिल्लीत खेळल्या जात असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात चार फिरकीपटूंचा समावेश केला आहे. प्लेईंग इलेव्हनकडे पाहता कांगारू संघात नॅथन लियॉन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन हे फिरकीपटू म्हणून खेळत आहेत. त्याचबरोबर ट्रॅव्हिस हेड हा देखील अष्टपैलू फिरकी गोलंदाज आहे. या फिरकीपटूंशिवाय दुसऱ्या कसोटीत कांगारू संघात वेगवान गोलंदाज म्हणून फक्त पॅट कमिन्स आहे.
हे देखील वाचा-