एक्स्प्लोर

Mumbai Crime Malad Railway station: मालाड रेल्वे स्थानकात आलोकच्या पोटात शस्त्रं खुपसलं, राजनाथ सिंहांना बातमी कळताच मुंबईत फोन फिरवला अन्...

Mumbai Malad Railway Station Murder: ओंकार शिंदे याच्या वकिलांनी आलोक सिंह यांची हत्या आपल्या अशिलाने केली नसल्याचा दावा कोर्टात केला. त्यांच्यात फक्त वाद झाला होता.

Mumbai Malad Railway Station Murder: मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आलोक सिंह असे असून ते विलेपार्ले येथील एनएम महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. ते शनिवारी मालाड रेल्वे स्थानकात उतरत असताना ओंकार शिंदे याच्याशी त्यांचे भांडण झाले. त्यावेळी ओंकार शिंदे याने आलोक सिंह यांच्या पोटात धारदार चिमटा खुपसला. पोटात अत्यंत खोलवर घाव झाल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन आलोक यांचा मृत्यू झाला होता. आलोक सिंह यांचे वडील अनिल सिंह हे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे सुरक्षारक्षक आहेत. गेल्या 25 वर्षांपासून अनिल सिंह हे राजनाथ सिंह यांचे सुरक्षारक्षक आहेत. त्यामुळे आलोकसोबत मालाड रेल्वे स्थानकात घडलेली घटना समजताच राजनाथ सिंह यांनी स्वत: मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. (Mumbai crime news)

राजनाथ सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असल्यापासून अनिल सिंह हे त्यांचे सुरक्षारक्षक आहेत. गेल्या 25 वर्षांपासून अनिल सिंह हे राजनाथ सिंहांसोबत सावलीसारखे आहेत. ते राजनाथ सिंह यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनिल सिंह यांच्या मुलाबाबत ही दुर्दैवी घटना घडल्याचे कळताच राजनाथ सिंहा यांनी तात्काळ फोन करुन  मुख्यमंत्री आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना मदत करण्याची सूचना दिली. यानंतर झपाट्याने सूत्रे हलली आणि रेल्वे पोलिसांनी युद्धपातळीवर आलोक सिंह यांच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली. 

आलोक सिंह हे मुंबईतच लहानाचे मोठे झाले. राजनाथ सिंह यांच्या सुरक्षेसाठी तैनात असल्यामुळे अनिल सिंह हे कायम मुंबईबाहेर असायचे. त्यामुळे आलोक सिंह त्यांच्या काकांकडेच राहायचे. अंधेरीतील बॉम्बे केंब्रिज शाळेत आलोक सिंह यांचे शिक्षण झाले. तीन वर्षांपूर्वी आलोक सिंह यांचा पूजा यांच्याशी विवाह झाला. पूजा सिंह यादेखील ठाकूर महाविद्यालयात शिक्षिका आहेत. आलोक सिंह शांत स्वभावाचे होते. ज्यादिवशी आलोक यांच्यावर हल्ला झाला त्यादिवशी पूजा यांचा वाढदिवस होता. घरी आल्यानंतर हे दोघे डिनरला जाणार होते. मात्र, त्यापूर्वी मालाड स्थानकात ओंकार शिंदे याने आलोक यांच्या पोटात चिमटा खुपसून त्यांची हत्या केली. 

Mumbai News: आलोक पाऊण तास स्टेशनवर तसाच पडून राहिला, वेळेत रुग्णालयात नेलं असतं तर....

रेल्वे पोलिसांनी आलोक सिंह यांच्या कुटुंबीयांना मालाड रेल्वे स्थानकात हल्ला झाला त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले. यामध्ये आलोक सिंह हे 40 ते 45 मिनिटं रेल्वे स्टेशनवर तसेच पडून होते. यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर लवकर उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असा आरोप आलोक सिंह यांचे काका सुनील सिंह यांनी केला. ओंकार शिंदे याने फक्त एकदाच धारदार चिमटा आलोक सिंह यांच्या पोटात खुपसला. मात्र, हा चिमटा नेमका आलोक सिंह यांच्या किडनीच्या भागात घुसला. त्यामुळे प्रचंड रक्तस्राव होऊन आलोक यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा

मालाड स्टेशनवर ओंकारने पोटात चिमटा खुपसला, आलोक सिंहांच्या पत्नीचा वाढदिवस, डिनरला जायचा बेत, पण त्याआधीच आक्रित घडलं

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget