(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना आता आणखी रंगतदार, प्रत्येक संघाला 8 ओव्हर्स खेळण्याची संधी, 9.30 ला सुरु होणार मॅच
IND vs AUS : पहिल्या टी20 सामन्यात भारताला 209 धावांचं लक्ष्य देऊनही पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता आजचा सामना 8 षटकांचा होणार असल्याने आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आज पार पडणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आल्याने नाणेफेक वेळेवर झाली नाही ज्यामुळे सामन्यालाही कमालीचा उशीर झाला आहे. त्यामुळे आता सामना 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार असून दोन्ही संघाना प्रत्येकी 8 ओव्हर्स खेळण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान षटकांची संख्या कमी केल्याने सामना अगदी रंगतदार होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
🚨 Update 🚨
— BCCI (@BCCI) September 23, 2022
Play to commence at 09.30 PM IST. 👏
Toss will take place at 09.15 PM IST. 👍
The second @mastercardindia #INDvAUS T20I will be an eight overs/side match. #TeamIndia pic.twitter.com/qZtKmTm3oG
मैदानाची स्थिती कशी?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी20 सामना (IND vs AUS, 2nd T20) नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर (Vidarbha Cricket Association Stadium) खेळवला जात आहे. या मैदानाच्या खेळपट्टीचा विचार करता हा पिच बॅटिंग फ्रेंडली आहे. म्हणजेच आजही पहिल्या सामन्याप्रमाणे एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. दरम्यान दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. तर फिरकीपटू मिडल ओव्हर्समध्ये कमाल करु शकतात. दरम्यान सामना 8 षटकांचा केल्यामुळे नेमका कोणता संघ सरस ठरेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल...आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 24 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय.
महत्वाच्या बातम्या :