Hardik Pandya: स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या मागील काही दिवसांपासून खास फॉर्ममध्ये नसल्याचं दिसून येत आहे. टी20 वर्ल्ड कप 2021 मध्येही त्याचं प्रदर्शन खास नव्हतं. त्यामुळे सध्या भारतीय संघात तो नसल्याचं दिसून येत आहे. पण नुकतंच आगामी आय़पीएलमध्ये (IPL 2022) पंड्याला अहमदाबाद संघाने आपला कर्णधार म्हणून घोषित करत तब्बल 15 कोटींना विकत घेतलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावर मोठी जबाबदारी असून त्याने या स्पर्धेआधी त्याच्या फिटनेसबद्दल भाष्य केलं आहे. 


आगामी आयपीएलमध्ये स्वत:ची रणनीती सांगताना 28 वर्षीय हार्दिक एका मुलाखतीदरम्यान म्हणाला, तो या स्पर्धेत तसंच यानंतर भारताकडून खेळताना एक ऑलराउंडर म्हणून चांगली खेळी करु इच्छित आहे. त्यामुळे तो त्याच्या फिटनेसवरही लक्ष देत असल्याचं म्हणाला. 


हार्दीकसह राशिद आणि शुभमनही अहमदाबादमध्ये


आयपीएलमधील 8 संघानी त्यांचे खेळाडू रिटेन केल्यानंतर लिलावापूर्वी लखनौ आणि अहमदाबाद या दोन आयपीएलमधील नव्या संघानाही तीन-तीन खेळाडू घेण्याची मुभा देण्यात आली. ज्यानंतर लखनौ संघाने केएल राहुल, स्टॉयनिस आणि बिश्नोई यांना करारबद्ध केलं आहे. तर अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पंड्या, फिरकीपटू राशिद खान आणि शुभमन गिल या तीन खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. हार्दिककडे अहमदाबाद संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. हार्दिक आणि राशिद खान यांना अहमदाबाद संघाने प्रत्येकी 15-15  कोटी रुपये दिले आहेत. तर शुभमन गिल याला आठ कोटी रुपयांत करारबद्ध केलं आहे. तीन खेळाडूंसाठी अहमदाबाद संघाने 38 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे या संघाकडे आता 52 कोटी रुपये शिल्लक आहेत.    


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha