Pushpa Dance Viral: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा भारतीय चित्रपटांच्या भलत्याच प्रेमात असल्याचं कायम पाहायला मिळतं. तो अनेकदा भारतीय सिनेमांमधील डायलॉग, गाणी यावर विविध व्हिडीओ तयार करुन त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. मागील काही दिवस सर्व प्रेक्षकांना भुरळ घातलेल्या दाक्षिणात्य सिनेमा पुष्पाने वॉर्नरलाही वेड लावलं असून तो या चित्रपटातील डायलॉग, गाणी यावर स्वत: अॅक्ट करुन व्हिडीओ शेअर करत असतो.


काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्यावरचे स्टेप करतानाचा व्हिडिओ वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यानंतर आता याच चित्रपटातील सामी या दुसऱ्या हीट गाण्यावर वॉर्नरच्या लेकी थिरकत असल्याचं दिसून येत आहे. वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या लेकींचा डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला भारतीय प्रेक्षकांचीही खूप पसंती मिळत आहे.


डेव्हिड वॉर्नरची इन्स्टाग्राम पोस्ट






डेव्हिड वार्नरनं याआधीही भारतीय चित्रपटातील डायलॉग तसंच गाण्यावरील डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, मागील काही दिवस तो पुष्पा चित्रपटातील डायलॉग, डान्स याचे व्हिडीओ शेअर करत असल्याने भारतीय क्रिकेट प्रेमींसह अल्लू अर्जूनच्या चाहत्यांनाकडूनही त्याला खूप प्रेम मिळत आहे. त्याच्या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले, तसंच व्ह्यूयज मिळाले आहेत. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha