ENG vs IND, 3rd T20, Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टी20 सामन्यात पाऊस येण्याची शक्यता? जाणून घ्या हवामानाची स्थिती
IND vs ENG : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज नॉटींगहमच्या ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट मैदानात खेळवला जात आहे.
ENG vs IND : भारतीय संघ आज इंग्लंड संघाविरुद्ध (India vs England) टी20 मालिकेतील तिसरी आणि अखेरची टी20 मॅच खेळणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टी20 मध्ये भारताने विजय मिळवल्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत इंग्लंडचा त्यांच्याच देशात जाऊन व्हाईट वॉश देऊ शकतो. दरम्यान इंग्लंडचा (England) संघ मात्र आजचा सामना जिंकण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न करणार असल्याने एक चुरशीचा सामना क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळू शकतो. विशेष म्हणजे आज सामना होणाऱ्या नॉटींगहमच्या ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट मैदानाच्या परिसरात पावसाची चिन्ह नसल्यामुळे सामना वेळेत आणि संपूर्ण ओव्हर्सचा होईल. तर नेमकं सामना होणाऱ्या परिसरातील आजचं अर्थात 10 जुलै रोजी हवामानाची स्थिती कशी असेल जाणून घेऊया...
भारत आणि इंग्लंड यांच्यीतल दुसरा टी20 सामना इंग्लंडच्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट मैदानात होत असून weather.com ने दिलेल्या माहिती नुसार 10 जुलै रोजी नॉटींगहमचे कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 13 डिग्री सेल्सियस असू शकतं. तसंच आकाशही साफ असणार आहे, त्यामुळे पावसाचा कोणताही व्यत्यय सामन्यात येणार नाही. पण इंग्लंडचं वातावरण कधीही बदलत असल्याने दिवसा याठिकाणी 8% तर रात्री 12% पावसाची शक्यताही वर्तविली गेली आहे.
तिसऱ्या टी20 साठी संभाव्य भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह,उमरान मलिक.
हे देखील वाचा-
- IND vs ENG 2nd T20, Match Highlights : भारताची इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी, 49 धावांनी विजय, मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी
- Bakri Eid 2022 : भारतीय क्रिकेटपटूंनी साजरी केली बकरी ईद, सिराज, आवेशसह उमरानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारचा नवा विक्रम, पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा पहिलाच गोलंदाज