ENG vs IND : आज भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होणार आहे. टी20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारत प्रयत्न करणार असून पहिला सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. इंग्लंडमधील वातावरण दररोज बदलत असल्याने कधीही पाऊस पडू शकतो. ज्यामुळे आजच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय येईल का? असे प्रश्न समोर येत असताना, हवामान विभागाच्या माहितीनुसार सामना होणाऱ्या मैदानाच्या परिसरात पावसाची चिन्ह नसल्यामुळे सामना वेळेत आणि संपूर्ण ओव्हर्सचा होईल. तर नेमकं लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट मैदानाजवळील वातावरण आज अर्थात 12 जुलै रोजी कसं असेल जाणून घेऊया...


भारत आणि इंग्लंड यांच्यीतल आजचा दुसरा एकदिवसीय सामना दुपारी 1 वाजता तर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. यावेळी दोन्ही संघाना मिळून 100 षटकं खेळायची असल्याने अशामध्ये पावसाचा व्यत्यय आल्यास दोन्ही संघाना अडचण होऊ शकते. दरम्यान समोर येणाऱ्या माहितीनुसार सामना होणाऱ्या लॉर्ड्स मैदानाजवळील परिसरातील वातावरण साफ असणार असून पाऊस होण्याची शक्यता नाही. तापमान 25 अंश डिग्री सेल्सियश राहणार असून पाऊस नसल्यामुळे संपूर्ण षटकांचा सामना होण्याची संपूर्ण शक्यता आहे.


भारत मालिकेत 1-0 ने पुढे


भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होत असून पहिला सामना जिंकत भारताने 1-0 ची आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडच्या संघाला 25.2 षटकात 110 धावांवर रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा आणि मोहम्मद शामीनं तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 


हे देखील वाचा-