India vs South Africa, T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत पराभूत झाला. त्यामुळे आता आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तरी विजय मिळवून भारतीय संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या तयारीत आहे. आजचा सामना कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत असून सर्वच खेळाडू दमदार खेळ करण्याच्या प्रयत्नात असतील. तर भारतीय संघाचा विचार करता नेमकं कोणत्या 5 खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असेल ते पाहूया...

  1. ईशान किशन : पहिल्या सामन्यात 48 चेेंडूत 76 धावांची तुफान खेळी करणाऱ्या ईशान किशनवर (Ishan Kishan) आज साऱ्यांच्या नजरा असतील, त्यामुळे आजही तो पहिल्या सामन्यासारखी कामगिरी करतो का हे पाहणं औत्सुक्याचं राहिल.
  2. दिनेश कार्तिक : आयपीएलमध्ये आरसीबीसाठी अगदी तुफान फटकेबाजी करत फिनिशर म्हणून नावारुपाला आलेल्या दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) बऱ्याच काळानंतर भारतीय संघात स्थान मिळालं आहे. त्याने आयपीएलमध्ये तर 16 सामन्यात 183.33 स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या. पहिल्या सामन्यात त्याला केवळ दोन चेंडू खेळायला मिळाले असल्याने दुसऱ्या सामन्यात तो काय करेल? ते पाहूया... 
  3. हार्दिक पांड्या : आयपीएल 2022 स्पर्धेत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याच्या नेतृत्त्वाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. हार्दिकच्या नेतृत्तवाखालीच गुजरात टायटन्सने आयपीएलचा चषक जिंकला असून त्यानंतर लगेचच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) सामन्यांसाठी हार्दिकची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली. पहिल्या सामन्यात त्याने 12 चेंडूत 31 धावा ठोकल्या. त्यामुळे आजच्या सामन्यातही तो कमाल करेल का? हे पाहावे लागेल.
  4. ऋतुराज गायकवाड : भारताचा आणखी एक युवा खेळाडू ज्याच्याकडे अनेकांचे लक्ष असेल तो म्हणजे सलामीवीर ऋतुराज गायकवाड. आयपीएल 2021 मध्ये तुफान फलंदाजीनंतर टीम इंडियात निवड होऊनही अधिक संधी न मिळाल्याने गायकवाड हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. पहिल्या सामन्यात तो चांगल्या लयीत होता, पण 23 धावाच त्याने केल्या असल्याने दुसऱ्या सामन्यात काय करेल ते पाहूया...
  5. अर्शदीप सिंह/उम्रान मलिक: आयपीएल गाजवलेले युवा गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आणि उम्रान मलिक (Umran Malik) यांना आता भारतीय संघात एन्ट्री मिळाली आहे. पण अंतिम 11 मध्ये ते निवडले गेलेले नाहीत. आता दुसऱ्या सामन्यात त्यांना संधी मिळाल्यास ते कमाल करण्याची दाट शक्यता आहे. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका उर्वरीत सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक  ठिकाण
दुसरा टी20 सामना 12 जून बाराबती स्टेडियम, कट्टक
तिसरा टी20 सामना 14 जून डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम
चौथा टी20 सामना 17 जून सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट
पाचवा टी20 सामना 19 जून एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु
हे देखील वाचा-