ICC World Cup IND vs SA : सध्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक (ICC Womens world cup 2022) सुरु आहे. या विश्वचषकातील आजचा सामना भारतीय महिला संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. आज भारतीय महिलांसमोर तगड्या दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. भारताचे आत्तापर्यंत सहा सामने झाले असून, यापेकी तीन सामने जिंकले आहेत, तर तीन सामने गमावले आहेत. त्यामुळं आजचा विजय भारतीय महिला संघासाठी महत्वाचा आहे.


दरम्यान, भारत आणि इंग्लंड दोन्ही संघानी तीन तीन सामने जिंकले आहेत. पण नेटरनरेट भारताचा काहीसा कमी असल्याने भारत पाचव्या तर इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. उद्या इंग्लंडचाही सामना असून ते पराभूत झाल्यास आणि भारताने विजय मिळवल्यास भारत सहज सेमीफायनलमध्ये पोहोचेल. तर दोन्ही संघ जिंकल्यास भारताने इंग्लंडपेक्षा मोठ्या फरकाने सामना जिंकायला हवा. जेणेकरुन भारत सेमीफायलमध्ये पोहोचेल. भारत सध्या गुणतालिकेत 5 व्या स्थानावर आहे.  


पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी वेस्ट इंडीजला मात दिली. पण चौथ्या सामन्यात इंग्लंडने आणि पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर निसटता विजय मिळवला. त्यानंतर बांग्लादेशवर भारताने तगडा विजय मिळवला असून, आता भारताला आजचा विजय महत्त्वाचा आहे.  


असा आहे भारतीय संघ:


मिथाली राज (कर्णधार), तानिया भाटीया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, मेघना सिंह, पुजा वस्त्रकर, रेणुका सिंह, शेफाली वर्मा, रिचा घोष, यस्तीका भाटीया.


महत्त्वाच्या बातम्या: