IPL 2022, CSK vs KKR Match Highlights :  केकेआरचा विजयाचा श्रीगणेशा, चेन्नईचा सहा विकेटनं पराभव

CSK vs KKR : चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा जाडेजाच्या खांद्यावर आहे तर कोलकाताचं नेतृत्व श्रेयस अय्यर करतोय. अय्यरने आधी दिल्ली संघाचं नेतृत्व केलेय. तर रवींद्र जाडेजा पहिल्यांदाच नेतृत्व करत आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Mar 2022 11:00 PM
IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates :  केकेआरचा विजयाचा श्रीगणेशा, चेन्नईचा सहा विकेटनं पराभव

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात कोलकाता संघाने विजयाने केली आहे. चेन्नईनं दिलेले 132 धावांचे आव्हान कोलकाता संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आहे. उमेश यादवची भेदक गोलंदाजी त्यानंतर अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स आणि नितेश राणा यांनी केलेल्या छोटेखानी खेळीच्या बळावर कोलकाताने चेन्नईचा पराभव केला.  एम.एस. धोनीने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली आहे. धोनीने 38 चेंडूत 50 धावांची खेळी केली होती.  


  

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : डीजे ब्राव्होनं केली मलिंगाची बरोबरी

 IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates :  38 वर्षीय ब्राव्होने कोलकात्याविरोधात भेदक गोलंदाजी केली. चार षटकांत ब्राव्होने 20 धावा देत तीन विकेट घेतल्या. यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लसिथ मलिंगाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मलिंगा आणि ब्राव्होच्या नावावर आयपीएलमध्ये 170 विकेट आहेत. 

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : केकेआरला चौथा धक्का

डीजे ब्राव्होची भेदक गोलंदाजी, कोलकात्याला दिला चौथा धक्का, बिलिंग्स 25 धावांवर बाद.. कोलकात्याला विजयासाठी 15 चेंडूत 9 धावांची गरज

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : केकेआरच्या 100 धावा

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : कोलकाता नाइट रायर्सच्या 100 धावा पूर्ण. 14.2 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 100 धावा पूर्ण केल्या आहेत. 

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : चेन्नईला तिसरे यश, अजिंक्य रहाणे बाद

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : अजिंक्य रहाणेची छोटेखानी खेळी, कोलकाताला तिसरा धक्का, अजिंक्य रहाणे 44 धावांवर बाद. कोलकात्याला विजयासाठी 42 धावांची गरज

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : डिजे ब्रॉव्होची भेदक गोलंदाजी, कोलकात्याला दुसरा धक्का 

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : ब्राव्होचा कोलकात्याला दुसरा धक्का, नितेश राणाला केलं बाद.  चेन्नईचं 132 धावांचं आव्हान, कोलकाताला विजयासाठी 56 धावांची गरज

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : रहाणे-राणाची फटकेबाजी

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates :  नितेश राणा आणि रहाणेच्या फटेकाबाजीमुळे कोलकाताने चेन्नईला बॅकफूटवर ढकलले आहे. कोलकात्याला विजयासाठी 66 चेंडूत 60 धावांची गरज

IPL 2022, CSK vs KKR : कोलकाताला पहिला धक्का, वेंकटेश अय्यर बाद

IPL 2022, CSK vs KKR : कोलकाताला पहिला धक्का, वेंकटेश अय्यरला ब्राव्होनं केलं बाद, नितेश राणा मैदानात, कोलकाता 6.4 षटकानंतर एक बाद एक बाद 43 धावा

IPL 2022, CSK vs KKR : धोनी-जाडेजाने डाव सावरला, चेन्नईच्या 100 धावा

IPL 2022, CSK vs KKR : धोनी-जाडेजाने डाव सावरला, चेन्नईच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. धोनी 29 तर जाडेजा 18 धावांवर खेळत आहे.

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नईचा अर्धा संघ तंबूत, शिवम दुबे बाद

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नईला पाचवा धक्का बसला आहे. अष्टपैलू आंद्रे रसेल याच्या गोलंदाजीवर सुनील नरेन याने शिवम दुबेचा झेल घेतला. 10.5 षटकानंतर चेन्नईच्या पाच बाद 61 धावा

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नईची पडझड, अंबाती रायडूही बाद

IPL 2022, CSK vs KKR : कोलकाता संघाच्या भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणापुढे बलाढ्य चेन्नईची पडझड सुरु झाली आहे. 52 धावांमध्ये चेन्नईने चार गडी गमावले आहेत. उथप्पानंतर अंबाती रायडूही बाद झाला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत सापडला आहे. 

IPL 2022, CSK vs KKR : उमेश यादवची भेदक गोलंदाजी, चेन्नईला दुसरा धक्का

IPL 2022, CSK vs KKR : उमेश यादवची भेदक गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजांनी नांगी टाकली आहे. उमेश यादवने कॉन्वेचा अडथळा दूर करत कोलकाताला दुसरे यश मिळवून दिलेय. 

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नईला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नईला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद झाला आहे. उमेश यादवच्या षटकांत गायकवाड बाद

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नईचे सलामी फलंदाज मैदानात, सामन्याला सुरुवात

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नईचे सलामी फलंदाज कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड मैदानात आले आहेत. सामन्याला सुरुवात झाली आहे.  

IPL 2022, CSK vs KKR : कोलकाता संघात तीन विदेशी खेळाडू

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलमध्ये जास्तीत जास्त चार विदेशी खेळाडू खेळवण्याचा नियम आहे. पहिल्याच सामन्यात कोलकाता संघाने तीन विदेशी खेळाडूंना खेळवले आहे. पहिल्या सामन्यासाठी काही विदेशी खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे कोलकाता संघाने तीन विदेशी आणि 8 भारतीय खेळाडूंसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 


 


चेन्नई संघातील विदेशी खेळाडू - 


कॉन्वे, ब्राव्हो, मिल्ने आणि सँटनर


 


कोलकाता संघातील विदेशी खेळाडू - 


बिलिंग्स, रसेल आणि नरेन 

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नईची प्लेईंग 11

IPL 2022, CSK vs KKR :  डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रॉबिन उथाप्पा, रवींद्र जाडेजा, एम एस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनगर, तुषार देशपांडे,  अॅडम मिल्ने.  

IPL 2022, CSK vs KKR : कोलकाताची प्लेईंग 11 मध्ये कुणाला वर्णी

वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितेश राणा, श्रेयस अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅकसन, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव.

IPL 2022, CSK vs KKR : श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

IPL 2022, CSK vs KKR : श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या शुभारंभाला रणवीर कूपर आणि आलिया भट्ट यांची उपस्थिती

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी होणाऱ्या कार्यक्रमाला अभिनेता रणवीर कूपर आणि आलिया भट्ट यांनी उपस्थिती दर्शवली आहे.





IPL 2022, CSK vs KKR : कोलकता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरही मैदानावर

कोलकता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरही मैदानावर





IPL 2022, CSK vs KKR : रवींद्र जाडेजा वानखेडे मैदानावर

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नईचा कर्णधार वानखेडेवर पोहचला





IPL 2022, CSK vs KKR : कोलकाताची प्लेईंग 11 कशी असेल

IPL 2022, CSK vs KKR : 


वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नारायण, चमिका करुणारत्ने, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव.

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नई संघाचे ट्विटवर दहा मिलियन फॉलोअर्स

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नई संघाचे ट्विटवर दहा मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. चेन्नई संघाने ट्वीट करत याची माहिती दिली आहे. 





IPL 2022, CSK vs KKR : पहिल्या सामन्यासाठी असे असतील चेन्नईचे अंतिम 11 खेळाडू?

IPL 2022, CSK vs KKR : डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रॉबिन उथाप्पा, रवींद्र जाडेजा, एम एस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो,  ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगरगेकर, अॅडम मिल्ने.

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नई सुपरकिंग्स संघाचं थीम साँग रिलीज

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नई सुपरकिंग्स संघाचं थीम साँग रिलीज कऱण्यात आले आहे. 





IPL 2022, CSK vs KKR : वासिम जाफरचं मजेदार ट्वीट

IPL 2022, CSK vs KKR : वासिम जाफरने आयपीएल सुरु होण्याआधी काही तास मजेदार ट्वीट केले आहे. पाहा काय म्हटलेय जाफरने...





IPL 2022, CSK vs KKR : इम्रान ताहिरच्या चेन्नई संघाला आणि रवींद्र जाडेजाला शुभेच्छा

IPL 2022, CSK vs KKR : चेन्नईचा माजी खेळाडू इम्रान ताहिर याने ट्विट करत आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या चेन्नई संघाला आणि रवींद्र जाडेजाला शुभेच्छा दिल्या आहेत.





IPL 2022, CSK vs KKR : कोलकाताकडून वेंकटेश अय्यर उतरणार सलामीला

IPL 2022, CSK vs KKR : कोलकाताकडून वेंकटेश अय्यर सलामीला उतरणार आहे. आयपीएल 2021 मधील अखेरच्या टप्प्यात वेंकटेश अय्यरने आपल्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. पदार्पणाच्या सामन्यात वेंकटेश अय्यरने 27 चेंडूत 41 धावा चोपल्या होत्या.  गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही वेंकटेश अय्यर कमाल करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.





पार्श्वभूमी

IPL 2022, CSK vs KKR : नव्या रंगात... नव्या ढंगात... आयपीएलचा नवा मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा रणसंग्रामाला अवघे काही तास उरले आहेत. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्स आणि उपविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दोन नव्या संघाची भर पडली आहे, त्यामुळे एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने होणार आहेत. तब्बल दोन महिने आयपीएलचा कुंभमेळावा रंगणार आहे. मागील 14 वर्ष आयपीएलनं भारतासह जगभरातल्या क्रिकेटप्रेमींना मनोरंजनाचा बंपर डोस दिला. पण यंदाच्या नव्या मोसमात बीसीसीआयनं स्पर्धेच्या रुपरेषेत अनेक बदल केले आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स आणि उपविजेता कोलकाता नाइट रायडर्स यांच्या सामन्याद्वारे होणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारसोबत मैदानात उतरणार आहेत. चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा रवींद्र जाडेजाच्या खांद्यावर आहे तर कोलकाताचं नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. श्रेयस अय्यरने याआधी दिल्ली संघाचं नेतृत्व केले आहे. तर रवींद्र जाडेजा पहिल्यांदाच नेतृत्व करत आहे. 


आयपीएलच्या पहिला हंगाम 2008 मध्ये खेळण्यात आला होता. या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघाला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2010 मध्ये चेन्नईनं मुंबई इंडियन्सला धूळ चाखून पहिली ट्राफी जिंकली होती. 2011 मध्ये चेन्नईच्या संघानं त्यांची दुसरी ट्रॉफी जिंकली. 2016 आणि 2017 मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नईच्या संघावर दोन वर्षाची बंदी घालण्यात होती. त्यानंतर 2018 मध्ये सनरायझर्सला अंतिम सामन्यात पराभूत करून चेन्नईनं तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. परंतु, 2020 मध्ये चेन्नईला काही खास कामगिरी करता आली नाही. या हंगामात चेन्नईचा संघ प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकला नाही. मात्र, 2021 मध्ये महिंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उचलली. आता चेन्नईचं नेतृत्व रविंद्र जाडेजा करणार आहे. चेन्नईसाठी जमेची बाजू म्हणजे,  2021 मधील अनेक खेळाडू लिलावात पुन्हा खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे संघबांधणीसाठी फारसा वेळ लागणार नाही. कोलकाता संघाचा विचार केल्यास यंदा कोलकाता संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. केकेआरने यंदाच्या महालिलावापूर्वी आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, सुनील नारायण या चौघांना रिटेन केलं होतं. त्यानंतर महालिलावात त्यांनी तब्बल 12.25 कोटी मोजत श्रेयस अय्यरला संघात सामिल केलं. याशिवाय पॅट कमिन्स, नितीश राणा, शिवम मावी यांच्यासाठीही मोठी रक्कम मोजली. 


चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार -
रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)


कोलकाता नाईट रायडर्सचा संघ - 
आंद्रे रस्सेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी), पॅट कमिन्स (7.25 कोटी), श्रेयस अय्यर (12.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅकसन (60 लाख), अजिंक्य रहाणे (1 कोटी), रिंकू सिंह (55 लाख), अनुकूल रॉय (20 लाख), रसिक डार (20 लाख), बाबा इंद्रजीत (20 लाख), चमिका करुणारत्ने (50 लाख), प्रथम सिंह (20 लाख), अभिजीत तोमर (40 लाख), अशोक शर्मा (55 लाख), सॅम बिलिंग्स (2 कोटी), आरॉन फिंच (1.5 कोटी), टीम साऊदी (1.5 कोटी), रमेश कुमार (20 लाख), मोहम्मद नबी (1 कोटी), उमेश यादव (2 कोटी), अमान खान (20 लाख)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.