एक्स्प्लोर

टीम इंडियासाठी गुड न्यूज, मुंबईत हार्दिक संघासोबत जोडला जाणार, पाहा लेटेस्ट अपडेट

Hardik Pandya Fitness Updates: भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळं विश्वचषकातल्या (World Cup 2023) लागोपाठ तिसऱ्या साखळी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

Hardik Pandya injury update : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळं विश्वचषकातल्या (World Cup 2023) लागोपाठ तिसऱ्या साखळी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना पांड्याचा घोटा दुखावला (Hardik Pandya injury) होता. त्यामुळं मागील रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत मुंबईमध्ये पोहचणार आहे. पण तो श्रीलंकाविरोधात खेळण्याची शक्यता नाही. दोन नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये सामना होणार आहे.  

हार्दिक पंड्याला झालेली दुखापत आणि त्याला विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमधून माघार घ्यावी लागणं भारतीय संघासाठी धक्कादायक आहे. भारतीय संघात समतोल साधण्याच्या दृष्टीनं हार्दिक पंड्यात अंतिम अकरा जणांमध्ये असणं किती महत्त्वाचं आहे. हार्दिक पंड्या सध्या बेंगळुरुमधील एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे.  मिळालेल्या वृत्तनुसार हार्दिक पांड्याच्या फिटनेसमध्ये सुधार आहे. तो खेळण्यासाठी तयारही झालाय. पण खबरदारी म्हणून त्याला आणखी आराम देण्यात येणार आहे. हार्दिक पांड्या श्रीलंकाविरोधातील सामन्यावेळी टीम इंडियासोबत असेल. पण त्याला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. 

बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या मुंबईमध्ये टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे. सध्या तो एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. श्रीलंकाविरोधात हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. पण तो संघासोबत जोडला जाणार आहे. दरम्यान, एनसीएमध्ये हार्दिक पांड्याने नेटमध्ये सराव सुरु केला. पांड्याने नेट्समध्ये बराच काळ गोलंदाजी आणि फलंदाजी केली. हार्दिक पांड्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे टीम इंडियासाठी ही मोठा दिलासा आहे.

दोन सामन्यात हार्दिक बाहेर - 

उपकर्णधार हार्दिक पांड्याला पुण्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दोन सामन्याला मुकावे लागले होते. न्यूझीलंड आणि इंग्लंडविरोधातील महत्वाच्या सामन्यात हार्दिक पांड्या उपलब्ध नव्हता.  मुंबईत श्रीलंकाविरोधात हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरोधात पांड्या उपलब्ध असेल. हार्दिक पांड्या टीम इंडियात परतल्यास संघाची ताकद आणखी वाढणार आहे. ही भारतीय चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज असेल. हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना संघात संधी देण्यात आली होती. पांड्याने वर्ल्डकपमधील 4 सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. फलंदाजीत त्याला फार संधी मिळाली नाही. भारतीय संघाचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित असल्याने तो लवकरात लवकर फिट व्हावा अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा असेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget