फायनल गमावली, पण स्पर्धा गाजवली; 'ही' आकडेवारी सांगते टीम इंडियाच वर्ल्डकपची खरी चॅम्पियन!
World Cup 2023 Final: ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचं 241 धावांचं लक्ष्य अगदी सहज गाठलं आणि ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरली.
ICC World Cup 2023 Final: ICC वर्ल्डकप 2023 चा (World Cup Final Win By Australia) अंतिम सामना कोट्यवधी भारतीयांची मनं तोडणारा ठरला. स्पर्धेच्या सुरुवातीपासून धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचा (Team India) अंतिम सामन्यात मात्र कांगारूंनी दारुण पराभव केला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं (Australia) टीम इंडियावर 6 विकेट्सनी मात केली आणि सहाव्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ट्रेविस हेडची (Travis Head) 137 धावांची मोठी खेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा ठरली अन् टीम इंडियानं दिलेलं 241 धावांचं लक्ष्य टीम इंडियानं अगदी सहज पार केलं. संपूर्ण वर्ल्डकप जर्नीमध्ये टीम इंडियाचा परफॉरमन्स धडाकेबाज होता. पण, कदाचित कालचा दिवस टीम इंडियाचा नव्हताच. अन् टीम इंडियाचं वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्न आणखी काही वर्षांसाठी पुढे गेलं.
वर्ल्डकप उंचावण्याचं स्वप्न भंगलं तरिदेखील यंदाच्या आयसीसी वर्ल्डकप 2023 च्या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी धमाकेदार होती. टीम इंडियानं ग्रुप सामन्यांपासून एकही सामना गमावलेला नव्हता. पण, फायनलमध्ये मात्र, चतूर कांगारूंनी टीम इंडियाला रोखलं आणि वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. पण अंतिम निकाल काहीही असो. वर्ल्डकप 2023 च्या संपूर्ण स्पर्धेतील खरी चॅम्पियन मात्र टीम इंडियाच आहे. हे आम्ही नाहीतर आकडे सांगतायत...
...म्हणून टीम इंडियाच खरी चॅम्पियन!
1. वर्ल्डकप 2023 मध्ये सर्व संघांना धू-धू धुतलं
वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियानं साखळी सामन्यांमध्ये सलग दहा विजय मिळवून थाटात फायनल्समध्ये धडक दिली होती. या काळात टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांचा पराभव केला होता. पण फायनलमध्ये मात्र टीम इंडियाच्या पदरी निराशा आली.
2. न्यूझीलंडला दोनदा हरवलं
वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केलं. धर्मशाला येथे टीम इंडियानं न्यूझीलंडचा 4 विकेट्सनी पराभव केला. तर वानखेडेवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्लॅक कॅप्स संघाचा 70 धावांनी पराभव झाला.
3. ऑस्ट्रेलियाला हरवूनच केलेली विजयी सुरुवात
टीम इंडियानं वर्ल्डकप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला विजय नोंदवला होता. या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुलच्या स्फोटक अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियानं कांगारूंचा 6 गडी राखून दारुण पराभव केला होता.
4. शतकवीरांचा संघ, टीम इंडिया
यंदाच्या विश्वचषकात टीम इंडियाची दमदार फलंदाजी संपूर्ण जगानं पाहिली. टॉप ऑर्डरपासून मधल्या फळीपर्यंत सर्वच फलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजांना घाम फोडला. विराट कोहलीनं यंदाच्या विश्वचषकात 3 शतकं झळकावलीत. तर श्रेयस अय्यरनं 2 शतकं झळकावली. तर कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुलनं प्रत्येकी एक शतक झळकावलं.
5. फलंदाजांचे कर्दनकाळ टीम इंडियाचे गोलंदाज
मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह यांच्या स्विंगनं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धडकी भरवली. तर, कुलदीप यादवच्या फिरकीनं फलंदाजांची चांगलीच नाचक्की केली. मोहम्मद शामीनं विश्वचषकात सर्वाधिक 24 विकेट घेतल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेत त्यानं तिनदा 5-5 विकेट्सही घेतल्या. तर, बुमराहला 20 आणि कुलदीपच्या खात्यात 15 विकेट्स आल्यात.