KKR New Jersey: आयपीएल आपल्या पंधराव्या हंगामाकडं (IPL 2022) कूच करत आहे. येत्या 26 मार्चपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ खेळत असल्यानं यंदाचा हंगाम अधिक मनोरंजक ठरणार आहे.  स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व फ्रँचायझींनी तयारी पूर्ण केली आहे. यातच कोलकाताच्या संघानं (KKR) आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी आपली नवी जर्सी लॉन्च केलीय.


कोलकाता नाईट रायडर्सनं आतापर्यंत आयपीएलचे 13 प्लेऑफ सामने खेळले आहेत. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या कोलकाताच्या संघानं 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर कोलकातानं प्रत्येक प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. दरम्यान, 2011, 2016, 2017 मध्ये एलिमिनेटर सामन्यात पराभूत होऊन कोलकात्याचा संघ बाहेर पडला. तर, 2018 मध्ये दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकात्याचा पराभव झाला होता.आयपीएलच्या मागच्या हंगमात कोलकात्याचा संघ उपविजेता ठरला.


ट्वीट-



कोलकाता नाईट रायडर्सचे शिलेदार
आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी), पॅट कमिन्स (7.25 कोटी), श्रेयस अय्यर (12.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅकसन (60 लाख), अजिंक्य रहाणे (1 कोटी), रिंकू सिंह (55 लाख), अनुकूल रॉय (20 लाख), रसिक डार (20 लाख), बाबा इंद्रजीत (20 लाख), चमिका करुणारत्ने (50 लाख), प्रथम सिंह (20 लाख), अभिजीत तोमर (40 लाख),     


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha