ICC Womens T20 World Cup 2024: आगामी 3 ऑक्टोबरपासून महिलांच्या आयसीसी टी-20 विश्वचषकाला (Womens T20 World Cup 2024) सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडच्या महिला संघाशी आहे. हा सामना 4 ऑक्टोबरला होणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडिया सहा ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. टीम इंडियाचा शेवटचा गट सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. जो 13 ऑक्टोबर रोजी शारजाह येथे खेळवला जाणार आहे. आणि याआधी श्रीलंकेविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
भारतीय संघाची घोषणा-
महिला टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे देण्यात आले आहे. तर स्मृती मानधनाला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासह टीम इंडियामध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे.
महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी भारताचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधा रेड्डी , रेणुका सिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन
राखीव खेळाडू: उमा छेत्री, तनुजा कंवर आणि सायमा ठाकोर
गटवारी-
अ गट : ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका.
ब गट : दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, स्कॉटलंड.
भारतीय संघाचं वेळापत्रक-
4 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड
6 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान
9 ऑक्टोबर- भारत विरुद्ध श्रीलंका
13 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
महिला टी-20 वर्ल्ड कप 2024चे संपूर्ण वेळापत्रक-
3 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजा
3 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजा
4 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
4 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
5 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजा
5 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजा
6 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
6 ऑक्टोबर : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
7 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजा
8 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजा
9 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
9 ऑक्टोबर : भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
10 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजा
11 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई
12 ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजा
12 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई
13 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजा
13 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा
14 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
15 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
17 ऑक्टोबर : उपांत्य फेरी 1, दुबई
18 ऑक्टोबर : उपांत्य फेरी 2, शारजाह
20 ऑक्टोबर : फायनल, दुबई
संबंधित बातमी:
झहीर खान लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात सामील; आयपीएल 2025 मध्ये दिसणार नव्या भूमिकेत!