झहीर खान लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात सामील; आयपीएल 2025 मध्ये दिसणार नव्या भूमिकेत!
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने मोठा बदल केला आहे. लखनौने टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू झहीर खानला संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्त केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर झहीर खानने विविध संघांसोबत काम केले.
आता लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात झहीर खान सामील झाला आहे. लखनौने याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
झहीर खानने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर 2017 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला. यानंतर झहीर खानने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. तो 2018 ते 2022 पर्यंत मुंबई इंडियन्ससोबत राहिला.
आता झहीर खान लखनौसाठी मेंटॉरची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या आधी गौतम गंभीर या पदावर होता.
गौतम गंभीर आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला. त्यांच्या जाण्यानंतर लखनौमध्ये मेंटॉरची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता झहीर खान या भूमिकेत राहणार आहे.
लखनौच्या कोचिंग स्टाफबद्दल बोलायचे झाले तर जस्टिन लँगर हे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. लान्स क्लुसनर आणि ॲडम व्होजेस हे संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. झहीर खानच्या आगमनानंतर कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल होणार नाही. पण झहीर खान मेंटॉर होण्यासोबतच इतर जबाबदाऱ्या पार पाडणार आहे.
झहीर खानची कारकिर्द दमदार राहिली आहे. झहीर खानने 100 आयपीएल सामन्यात 102 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात केवळ 17 धावांत 4 विकेट्स घेणे ही सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
झहीर खानने भारतासाठी 17 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खानने 200 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 282 विकेट्स घेतल्या आहेत. तर झहीर खानने टीम इंडियासाठी एकूण 311 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.