Women's World Cup : आजपासून महिला क्रिकेट विश्वचषक 2022 स्पर्धेची सुरुवात (ICC Womens Cricket World Cup 2022) होणार आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. विश्वचषकाचा सलामीचा सामना स्पर्धेचं यजमान असलेल्या न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात आठ संघांमध्ये 27 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर गुणपत्रकानुसार, चार संघांमध्ये सेमी फायनल्सचे सामने रंगतील. त्यानंतर तीन एप्रिलला फायनल खेळवण्यात येईल. या विश्वचषकाचे सर्व सामने न्यूझीलंडमधील सहा शहरांमध्ये खेळवण्यात येतील. 


बीसीसीआयनं महिला क्रिकेट विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मिताली राजकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तर, हरमनप्रीत कौरकडं उपकर्णधाराची जबाबादारी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज शिखा पांडेला संघात स्थान मिळालेलं नाही. चाहत्यांसाठी हा धक्का मानला जातो. शिखा पांडे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तिनं ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीला क्लीन बोल्ड केलं होतं. या चेंडूची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरनं तर या चेंडूला महिला क्रिकेटमधील बॉल ऑफ द सेन्चुरी असं म्हटलं होतं. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 6 मार्च रोजी बे-ओव्हल तौरंगा येथे होणार आहे. 



यंदाचा महिला विश्वचषक अनेक कारणांनी वेगळा ठरणार आहे. अशातच महिला क्रिकेट विश्वचषकात सलग दुसऱ्यांदा DRS चा वापर होणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (ICC) नं दिलेल्या माहितीनुसार, 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं कव्हरेज अभूतपूर्व असेल. महिला क्रिकेट विश्वचषकात डीआरएस वापरण्याची ही दुसरी वेळ असेल. 2017 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान याचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता.


भारतीय महिला क्रिकेट संघाचं वेळापत्रक



  • भारत विरुद्द पाकिस्तान - 6 मार्च 2022 

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- 10 मार्च 2022

  •  भारत विरुद्ध वेस्ट इंडीज- 12 मार्च 2022

  • भारत विरुद्ध इंग्लंड- 16 मार्च 2022

  • भारत विरुद्ध ऑकलँड- 19 मार्च 2022

  • भारत विरुद्ध बांगलादेश- 22 मार्च 2022

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- 27 मार्च 2022


महिला क्रिकेट विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ


मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघा सिंह, रेणुका सिंह ठाकुर, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वर गायकवाड, पूनम यादव.


स्टँड बाय प्लेयर : एकता बिष्ट, सिमरन दिल बहादुर आणि साभीनेनी मेघना


महत्त्वाच्या इतर बातम्या :