मोहाली: भारतीय क्रिकेट आणि विराट कोहलीसाठी शुक्रवारचा दिवस काही खास असणार आहे. मोहालीमध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये पहिला कसोटी सामना रंगणार असून विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना असणार आहे. आपल्या 100 व्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली सज्ज झाला असून क्रिडाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशा प्रकारे 100 कसोटी सामना खेळणारा विराट कोहली हा 12 वा भारतीय खेळाडू ठरणार आहे.
विराट कोहलीची ओळख ही आक्रमक फलंदाज अशी आहे. आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले आहेत. भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार अशीही त्याची ओळख आहे. पण गेल्या काही दिवसांत अशा घडामोडी घडल्या की विराटला तिन्ही प्रकारच्या किक्रेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यायला लागला.
विराट कोहली 2019 नंतर एकही शतक करु शकला नाही. पण त्याच्या धावांची सरासरी 40 च्या आसपास आहे. त्यामुळे विराट पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येच्या शोधात आहे. आता शुक्रवारी तो त्याच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळणार असून शतकी खेळी खेळतो का याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.
संबंधित बातम्या:
- विराट 100 व्या कसोटी सामन्यासाठी सज्ज, शतकाची प्रतिक्षा संपणार
- Virat Kohli 100th Test: विराटचा 100 वा कसोटी सामना तुम्हीही पाहू शकता, प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील निर्बंध शिथिल
- Virat Kohli: विराट कोहली 100 व्या सामन्यासाठी सज्ज; क्रिडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव