ICC Test Ranking: भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील पाचवा आणि रिशेड्युल सामन्यानंतर आयसीसीनं नुकतीच कसोटी क्रमवारीका जाहीर केली आहे. ताज्या क्रमावारीनुसार, भारताचा अष्टपैलू खेळाडू ऋषभ पंत टॉप-मध्ये एन्ट्री करण्यास यशस्वी ठरलाय. तर, भारताविरुद्ध दोन शतक झळकावणारा जॉनी बेरअस्टोनं 13 स्थानांची झेप घेत दहाव्या क्रमांकावर पोहचलाय. बेअरस्टोनं त्याच्या कारकिर्दीतील मागच्या तीन कसोटी सामन्यात चार शतक ठोकली आहेत. महत्वाचं म्हणजे, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तब्बल सह वर्षानंतर टॉप-10 मधून बाहेर झालाय. 


ऋषभ पंतची चमकदार कामगिरी
इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात ऋषभ पंतनं पहिल्या डावात 111 चेंडूत 146 धावा केल्या होत्या. त्यानतंर दुसऱ्या डावातही 57 धावांची खेळी केली होती. त्यानं मागील सहा कसोटी सामन्यात दोन शतक आणि तीन अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत सर्वोच्च स्थान मिळवलंय. त्यानं दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली. 


विराटची तीन स्थानांनी घसरण
इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात विराट कोहलीला पहिल्या डावात 11 तर, दुसऱ्या डावात 20 धावा करता आल्या. त्यामुळं कोहलीची 714 रेटिंगसह तीन स्थानांनी घसरून झाली असून तो आता 13व्या क्रमांकावर गेलाय. कोरोनामुळं बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातून बाहेर पडलेला रोहित शर्मा नवव्या स्थानावर घसरला आहे. तर गेल्या पाच डावांत चार शतके झळकावणारा इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो 11 स्थानांनी झेप घेत 10व्या स्थानावर पोहोचला आहे.


जो रूट कसोटी क्रिकेटचा बादशाह
आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट अव्वल स्थानी आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील चौथ्या डावात नाबाद 142 धावांची खेळी केली होती. त्यानं आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च 923 रेटिंग मिळवले आहे. यासह, तो आयसीसी रँकिंग इतिहासातील टॉप 20 सर्वोच्च रेटिंग असलेल्या फलंदाजांच्या एलिट यादीत सामील झाला आहे.


हे देखील वाचा-