Wimbeldon 2022: लंडनमध्ये ऑल इंग्लंड ओपन अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या विम्बल्डन 2022 या टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या सामन्यात सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचनं (Novak Djokovic) इटलीच्या यानिक सिनरचा (Jannik Sinner) पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या विजयासह जोकोविचनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. तसेच विम्बल्डन स्पर्धेत सलग 26 वा सामना जिंकण्याचा त्यानं पराक्रम केलाय. त्यानं विम्बल्डन स्पर्धेत 2006 मध्ये अखेरचा सामना गमावला होता. तेव्हापासून त्याला एकदाही पराभव स्वीकारावा लागला नाही.
नोवाक जोकोविचचं जोरदार कमबॅक
विम्बल्डन 2022 च्या उपांत्य पूर्व फेरीत नोवाक जोकोविच आणि यानिक सिनर आमने सामने आले होते. 3 तास 35 मिनिटे चाललेल्या या सामन्यात यानिक सिन्नरनं चमकदार कामगिरी करत दोन्ही सेट आपल्या नावावर केलं. मात्र, त्यानंतर जोरदार कमबॅक करत जोकोविचनं सिनरचा 5-7, 2-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला. नोवाक जोकोविचनं 41 वेळा विम्बल्डनची उपांत्य फेरीत धडक दिलीय.
विम्बल्डन स्पर्धेतील सलग 26 वा विजय
सातव्या विम्बल्डन विजेतेपदाच्या वाटेवर असलेल्या जोकोविचचा विम्बल्डन स्पर्धेतील हा सलग 26वा विजय आहे. टेनिस विश्वात 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या जोकोविचनं विम्बल्डन 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या पाच सेटमध्ये 11 पैकी 10 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, त्यानं शेवटचा सामना 2006 मध्ये गमावला होता.
विम्बल्डन स्पर्धेतील नोवाक जोकोविचची कामगिरी
विम्बल्डन स्पर्धेत नोवाक जोकोविचनं आतापर्यंत 84 सामने जिंकले आहेत. या विजयासह त्यानं जिमी कॉनर्सच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. विम्बल्डन स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टेनिसपटूच्या यादीत रॉजर फेडरर अव्वल स्थानी आहे. लवकरच नोवाक जोकोविच रॉजर फेडररचा विक्रम मोडेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
हे देखील वाचा-