ENG vs IND: भारताविरुद्ध बर्मिंगहॅम येथे खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यात इंग्लंडनं सात विकेट्नं विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. अखेरच्या सामन्यात इंग्लंडनं विजय मिळवल्यानं त्यांचे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांचा एक समूह बार्मी आर्मीनं जॉनी बेअरस्टोचा फोटो शेअर करून इग्लंडनं भारताचा 1-0 असा पराभव केला, असं ट्वीट केलंय. यावर भारताचा फिरकीपटू अमित मिश्रानं (Amit Mishra) संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 


बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट 2021 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील अखरेचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. हा सामना 1-5 जुलै 2022 दरम्यान बर्मिगहॅम येथे खेळण्यात आला. ज्यात भारत पराभूत झालं. त्यानंतर ‘बार्मी आर्मी'नं सोशल मीडियावर इंग्लंडनं भारतावर 1-0 असा विजय मिळवला, अशी पोस्ट केली. यावर अमित मिश्रानं नाराजी दर्शवत आपली प्रतिक्रिया दिली. "इंग्रजांना त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी इतिहासाशी छेडछाड करण्याची सवय आहे", असं त्यानं ट्विट केलंय.


ट्वीट- 



भारतानं सात विकेट्सनं सामना गमावला
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतानं भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात 284 धावांवर रोखलं आणि 134 आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 245 धावांपर्यंत मजल मारता आली. अखेरच्या डावात इंग्लंडला 378 धावांची गरज असताना जो रूट (142 धावा) आणि जॉनी बेअरस्टोनं (114 धावा) दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.



हे देखील वाचा-