ENG vs IND:  बर्मिंगहॅम येथे खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या पदरात निराशा पडली. या सामन्यात भारताचा सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. भारताला आता इंग्लंडशी तीन सामन्यांची टी-20 आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. येत्या 7 जुलैपासून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ टी-20 मालिकेला सुरुवात करणार आहे. या मालिकेत विजय मिळवून भारतीय संघ बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या पराभवाची खपली भरून काढण्यासाठी मैदानात उतरेल.

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं लिसेस्टशायर संघाविरुद्ध सराव कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यातील तिसऱ्या दिवशीच रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. ज्यामुळं त्याला संघाबाहेर पडावं लागलं. तसेच बर्मिंगहॅम कसोटीतून वगळण्यात आलं. परंतु, इंग्लंडविरुद्ध आगामी टी-20 मालिकेतून तो संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा तब्बल 112 दिवसानंतर भारतासाठी सामना खेळणार आहे. त्यानं भारतासाठी 14 मार्चला अखेरचा सामना खेळला होता. 

इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 7 जुलै एजेस बाउल
दुसरा टी-20 सामना 9 जुलै एजबॅस्टन
तिसरा टी-20 सामना 10 जुलै ट्रेंट ब्रिज

इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक- 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै ओव्हल 
दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना 17 जुलै मँचेस्टर 

 

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार) मयांक अगरवाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा. 

हे देखील वाचा-