ICC T20 WC 2021, RSA vs BAN: टी-20 विश्वचषकातील 30 व्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या संघाने बांग्लादेशाला पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकूण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बांग्लादेशला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. मात्र, आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर बाग्लांदेशच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. बांग्लादेशाने 20 षटकात 4 विकेट्स गमावून 84 धावा केल्या. बांग्लादेशाकडून मिळालेले लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 13. 3 षटकातच पूर्ण केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे 6 गुण झालेत. 


बांग्लादेशाच्या संघाकडून मोहम्मद नईम (11 बॉल 9), लिटन दास (34 बॉल 24 धावा), सौम्या सरकार (1 बॉल 0 धाव), मुशफिकुर रहीम (3 बॉल 0 धाव), महमुदुल्ला (9 बॉल 3 धावा), अफिफ हुसैन (1 बॉल 0 धाव), शमीम हुसेन (20 बॉल 11 धावा), महेदी हसन (25 बॉल 27 धावा), नसुम अहमद (1 बॉल 0 धाव), तस्किन अहमदने 1 बॉल खेळून शून्य धाव केली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि अॅनरिक नॉर्टजे यांना प्रत्येकी तीन-तीन विकेट्स मिळाल्या. तबरेझ शम्सी दोन तर, अॅनरिक नॉर्टजेला एक विकेट्स मिळाली. 
 
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी केली. या सामन्यात क्विंटन डी कॉक (15 बॉल 16 धावा), रीझा हेंड्रिक्स (5 बॉल 4 धावा), टेम्बा बावुमा (28 बॉल 31 धावा), रॅसी व्हॅन डर ड्युसेन (27 बॉल 22 धावा), एडन मार्कराम (4 बॉल 0 धाव),  (नाबाद, ड्वेन प्रिटोरियस (नाबाद 28 बॉल 31 धावा) आणि डेव्हिड मिलरने नाबाद 5 धावा केल्या. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 13. 3 षटकातच विजय मिळवला. बांग्लादेशकडून तस्कीन अहमदने दोन विकेट्स पटकावल्या. तर, मेहंदी हसन आणि नसून अहमदला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 


संबंधित बातम्या-