टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत (T20 World Cup 2021) आज दोन सामने होत आहेत. पहिला सामना अफगाणिस्तान आणि नामिबिया (Afghanistan vs Namibia) यांच्यात अबूधाबीच्या शेख जायद स्डेडिअम सुरु आहे. तर, दुसरा आणि महत्वाचा सामना भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज दुबई आंतराराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवू शकतो. यामुळे दोन्ही संघासाठी हा 'करो या मरो'चा सामना आहे. मात्र, यंदाच्या विश्वचषकात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने 86 टक्के विजय मिळवला आहे. यामुळे आजच्या सामन्यातही नाणेफेक जिंकणे अधिक महत्वाचे ठरू शकते.
टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 14 सामने खेळले गेले आहेत. या स्पर्धेत नाणेफेक जिंकणाऱ्या बहुतेक संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या संघांनी 86 टक्के विजय मिळवला आहे. या विश्वचषकात नाणेफेक जिंकलेल्या संघानी 14 पैकी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या दोन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी बाजी मारली, त्यात पहिले नाव अफगाणिस्तानचे आणि दुसरे नाव वेस्ट इंडिजचे आहे. स्कॉटलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 190 धावांपर्यंत मजल मारली आणि नंतर स्कॉटलंडचा संघाला अवघ्या 60 धावांवर ऑल-आऊट केले. त्याचवेळी वेस्ट इंडिजने एका रोमांचक सामन्यात बांगलादेशचा 3 धावांनी पराभव केला.
नाणेफेक जिंकून विजय मिळवलेले संघ-
1) आस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर 5 विकेट्सने विजय
2) इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव केला.
3) श्रीलंकेने बांगलादेशला 5 विकेट्सने मात दिली.
4) पाकिस्तानने भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवला.
5) दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने पराभव केला.
6) पाकिस्तानने न्यूझीलंडला 5 विकेट्सने मात केली.
7) इंग्लंडने बांगलादेशचा 8 विकेट्स राखून पराभव केला.
8) नामिबियाने स्कॉटलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला.
9) ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर 7 विकेट्सने मात केली.
10) पाकिस्तानने अफगाणिस्तानला 5 विकेट्सने मात दिली.
11) दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवला.
12) इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्स राखून पराभव केला.
भारत आणि यांच्यात होणारा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारत काय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधीची आकडेवारी पाहता नाणेफेक जिंकल्यावर भारत किंवा न्यूझीलंडचा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
संबंधित बातम्या-