आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभून करून चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) चॅम्पियन बनली. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नईच्या संघाने चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली. मात्र, आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. ज्यामुळे चेन्नईच्या संघाला त्यांच्या प्रत्येक खेळाडूला रिटेन करणे शक्य नाही. नियमानुसार, कोणताही संघ त्यांच्या केवळ 4 खेळाडूला रिटेन करू शकतो. याशिवाय, राईट टू मॅच कार्डचा पर्याय देखील उपलब्ध नाही. यातच चेन्नईच्या चाहत्यांना धक्का देणारी माहिती समोर आलीय. महेंद्रसिंह धोनी पुढील हंगामात चेन्नईचा संघ सोडणार असल्याचे फ्रंचायझीचे मालक एन श्रीनिवासन यांनी म्हटलंय. यामागचे कारणही त्यांनी सांगितलंय.


एन श्रीनिवासन यांनी एका मुलाखतीत म्हटलंय की, धोनी हा एक निष्पक्ष व्यक्ती आहे. त्याला रिटने करण्यासाठी संघाने जास्त पैसा खर्च करू नये, असं त्याला वाटतंय. परंतु, धोनीने पुढील हंगामात आमच्या संघाकडूनच खेळावे, अशी आमची इच्छा आहे. मी संघाच्या निर्णायावर कोणताही दबाव टाकत नाही. 


जर चेन्नईचा संघाने त्यांच्या चार खेळाडूंना रिटेन केल्यास त्यांना 16 कोटी रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय, संघ तीन खेळाडूंना रिटेन केल्यास ही रक्कम 15 कोटी रुपये होईल आणि एक किंवा दोन खेळाडूंना रिटेन केल्यास त्यांना 14 कोटी रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईचा संघाने 4 खेळाडूंना रिटेन करेल आणि सर्वाधिक रक्कम महेंद्र सिंह धोनीला मिळेल, अशी अपेक्षा आहे. 


दरम्यान, महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याबाबत अद्याप काहीच बोलला नाही. तो आणखी एका हंगामात चेन्नईकडून खेळू शकतो. जरी त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. तरी तो चेन्नईच्या संघाचा भाग असेल. आयपीएलच्या पुढील हंगामात 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरणार आहेत. याशिवाय, 60 ऐवजी 74 सामने खेळले जाणार आहेत. या हंगामासाठी होणारे मेगा ऑक्शन डिसेंबर- जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, या हंगामात 2 नवे संघ जुडणार असल्याने 50 नव्या खेळाडूंना संधी मिळाणार आहे. 


संबंधित बातम्या-