ICC T20 Rankings : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या टी20 सीरिजमध्ये उत्तम कामगिरी केली. ज्याचा फायदा या दोघांनाही आयसीसीच्या टी-20 च्या लेटेस्ट रॅकिंगमध्ये झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध खेळवण्यात आलेली तीन सामन्यांची टी-20 सीरिज 2-1 ने आपल्या नावे केली आहे.


ICC ने टी-20 रॅकिंगमध्ये केएल राहुल आणि विराट कोहलीच्या स्ठानामध्ये सुधारणा केली आहे. विकेटकीपर-फलंदाज राहुलने प्रत्येक एका क्रमांकाने आघाडी घेतली आहे. आयसीसीच्या यादीत केएल राहुलने तिसरं तर विराट कोहलीने आठवं स्थान पटकावलं आहे. कॅनबरामध्ये पहिल्या टी-20 मध्ये अर्धशतक फटकावणारा राहुल ऑस्ट्रेलियाचा सीमित ओव्हर्सचा कर्णधार एरॉन फिंचच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.





एसजीजीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात अंतिम टी-20 सामन्यात 85 धावांची खेळ करणारा विराट कोहलीही एक स्थानाने पुढे आला आहे. इंग्लंडचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मलानने फलंदाजांच्या आयसीसी टी-20 आय रॅकिंगमध्ये टॉपवर आहे. आयसीसी टी-20 रॅकिंगच्या टॉप-10 मध्ये कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल आपली जागा तयार करण्यात यशस्वी झाले आहेत.


ICCच्या नव्या टी-20 रँकिंगमध्ये केएल राहुल सर्वाधिक रँकिंग असणारा भारतील फलंदाज आहे. राहुलकडे यंदा 816 पॉईंट्स आहेत. तसेच विराट कोहलीचे 697 पॉईंट्स आहेत. भारतील संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरोधात खेळवण्यात आलेल्या टी-20 सीरीजमध्ये संघात समावेश नव्हता. त्यामुळे रोहित टॉप-10 मध्ये जागा निर्माण करु शकला नाही. 915 पॉईंट्ससोबत इंग्लंडचा डेव्हिड मलान पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजमलाही 871 पॉईंट्स असून तो दुसऱ्या स्थानी आहे.


महत्त्वाच्या बातम्या :