ICC T 20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 साठी (ICC T-20 World Cup 2024) आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहीद अफ्रिदीवर (Shahid Afridi) मोठी जबाबदारी सोपवली आहे. शाहीद अफ्रिदीला आगामी टी-20 विश्वचषकाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. याआधी आयसीसीने युवराज सिंह, ख्रिस गेल, उसेन बोल्टलाही ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. (Shahid Afridi has been appointed as the brand ambassador of T20 World Cup 2024)






2 जूनपासून रंगणार विश्वचषकाचा थरार-


आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T-20 World Cup)ची स्पर्धा 2 जूनपासून सुरु होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.


जेतेपद पटकावणार संघ होणार मालामाल-


टी-20 विश्वचषक पटकावणारा संघ मालामाल होणार आहे. टी-20 विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम 5.6 दशलक्ष डॉलर्स आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये किंमत पाहिली तर ती अंदाजे 46.77 कोटी रुपये येते. त्याचबरोबर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स मिळतील. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 13.36 कोटी रुपये आहे. तर उपविजेत्याला 6.68 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे.


विश्वचषकासाठी पात्र ठरलेले 20 संघ...


अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 


कोणत्या गटामध्ये कोणते संघ


अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ


भारतीय संघाचे विश्वचषकाचं वेळापत्रक


5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 


संबंधित बातम्या:


Team India Head Coach: स्टीफन फ्लेमिंगला टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायचे आहे? चेन्नईच्या CEO ने केला धक्कादायक खुलासा!


Hardik Pandya and Natasa Stankovic: हार्दिक पांड्या अन् नताशाचा घटस्फोट होणार?; 4 घडामोडींनी वेधलं लक्ष, सोशल मीडियावर चर्चांना उधाण!


Virat Kohli: नरेंद्र मोदी मैदानावर विराट कोहलीचे 6 महिन्यात दोनदा स्वप्न भंगले; 700 धावांचा आकडा ठरला 'Unlucky'!