IPL 2024 RCB Virat Kohli: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात झालेल्या एलिमिनेटरच्या लढतीत राजस्थानने बाजी मारली. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात राजस्थानने बंगळुरुचा 4 विकेट्सने पराभव केला. या पराभवामुळे आयपीएलच्या 17व्या हंगामातूनही बंगळुरुला जेचेपदाविना निरोप घ्यावा लागला.
गुजरातमधील नरेंद्र मोदी या मैदानावर झालेल्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) बंगळुरुसाठी चांगली कामगिरी करु शकला नाही. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 15 सामन्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 741 धावा केल्या. पंरतु यानंतरही बंगळुरुला फायनलपर्यंत कोहली पोहचू शकला नाही.
नरेंद्र मोदी मैदानावर कोहलीचे दोनदा स्वप्न तुटले-
गेल्या 6 महिन्यांत नरेंद्र मोदी स्टेडियमवर विराट कोहलीचे दोनदा स्वप्न तुटल्याचे पाहायला मिळाले. सहा महिन्यांपूर्वी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होता. या विश्वचषकात विराट कोहलीने 11 सामन्यात 765 धावा केल्या. कोहलीने अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावले होते. पण भारताचा पराभव झाला होता. योगायोगाने, आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमनेसामने होते. IPL 2024 मध्ये विराट कोहलीने 15 सामन्यात 741 धावा केल्या होत्या. एलिमिनेटर सामन्यात कोहलीने 24 चेंडूत 33 धावा केल्या. पण बंगळुरूने हा सामना गमावला आणि आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला.
आयपीएलमध्ये विराटला तोड नाही -
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडलाय. 17 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. 2008 तते 2024 या 17 वर्षांमध्ये विराट कोहलीने 8000 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 252 सामन्यात 8000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके आणि 55 अर्धशतकाचा समावेश आहे. विराट कोहलीने 132 च्या स्ट्राईक रेटने आणि 39 च्या सरासरीने आयपीएलमध्ये धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 705 चौकार ठोकले आहेत, तर 272 खणखणीत षटकारही ठोकले आहेत. विराट कोहलीने फिल्डिंगमध्ये 115 झेल घेण्याचा पराक्रमही केला आहे. गोलंदाजीमध्ये विराट कोहलीने चार विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 8 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शिखर धवन याच्या नावावर 6769 धावा आहेत. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 257 सामन्यात 6628 धावा केल्या आहेत. डेविड वॉर्नर 6565 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मिस्टर आयपीएल सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर आहे. रैनाने 5528 धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर 5243 तर एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर 5162 धावा आहेत. ते अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमामकावर आहे.